ETV Bharat / bharat

IND vs AUS T20 Series : सलग दुसरी मालिका जिंकण्यास टीम इंडिया सज्ज; बुमराह, हर्षलच्या कामगिरीवर असणार विशेष लक्ष

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात ( IND vs AUS 1st T20 ) टीम इंडियाचा मंगळवारी मोहालीत ऑस्ट्रेलिया संघाशी सामना होणार आहे. सायंकाळी साडेसात वाजल्यापासून सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

IND vs AUS
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत
author img

By

Published : Sep 20, 2022, 12:19 PM IST

मोहाली: मंगळवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत ( IND vs AUS T20 Series ) विश्वचषकापूर्वी भारत त्यांचे योग्य संयोजन, विशेषत: मधल्या फळीतील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, भारताने वर्चस्व गाजवले आहे. जर टीम इंडियाने ही मालिका जिंकली तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा सलग दुसरा मालिका विजय ठरेल. यापूर्वी 2020 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. तेव्हा तीन सामन्यांची मालिका 2-1ने जिंकली होती. दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत एकूण नऊ टी-20 मालिका खेळल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये चार मालिका भारताने आणि दोन ऑस्ट्रेलियाने जिंकल्या आहेत. तीन मालिका अनिर्णित राहिल्या.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 हेड टू हेड ( India vs Australia T20 head to head ) -

टी-20 क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 23 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 13 सामने जिंकून भारताने वर्चस्व राखले आहे. ऑस्ट्रेलियाने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये भारताविरुद्ध 9 विजय मिळवले आहेत, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात टीम इंडियाच्या विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर भारत येथेही पुढे आहे. टीम इंडियाने घरच्या मैदानावर 7 पैकी 4 सामन्यात कांगारूंचा पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतीय भूमीवर केवळ तीन सामने जिंकले आहेत.

संघाबद्दल बोलायचे झाले तर, विश्वचषकापूर्वी टीम इंडिया संघ बांधणीवर लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करेल. ज्यामध्ये मधली फळी भक्कम करण्यापूर्वी वेगवान गोलंदाजीवर विशेष लक्ष दिले जाईल. या मालिकेपूर्वी झालेल्या सामन्यांमध्ये भारतीय संघाने आपल्या प्रमुख गोलंदाजांना विश्रांती दिली होती, परंतु आता या गोलंदाजांचे भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्यामुळे त्यांचा ही कस पाहिला जाईल. कारण ऑस्ट्रेलियानंतर भारत तीन सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद भूषवणार आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये लवचिकता राखणे महत्त्वाचे ठरले असते परंतु कर्णधार रोहित शर्माने ( Captain Rohit Sharma ) आधीच स्पष्ट केले आहे की ऑस्ट्रेलियातील आयसीसी स्पर्धेपूर्वी सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न त्याचे खेळाडू करतील.

बुमराह, हर्षलच्या कामगिरीवर असणार विशेष लक्ष -

आशिया चषक स्पर्धेत भारताने चांगली फलंदाजी केली असली तरी या काळात अनेक बदलही केले. या स्पर्धेत भारताच्या गोलंदाजीतील कमकुवतपणाही समोर आला, पण हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनामुळे आक्रमणाला बळ मिळाले आहे. रोहितने स्पष्ट केले की विश्वचषकात फक्त केएल राहुलच त्याच्यासोबत डावाची सुरुवात करेल, पण विराट कोहली त्याच्यासोबत डावाची सुरुवात करेल अशी शक्यता आहे. शेवटच्या टी-20 डावात शतक झळकावणाऱ्या कोहलीला काही सामन्यांसाठी सलामीवीर म्हणून मैदानात उतरवले जाऊ शकते.

ऋषभ पंत की दिनेश कार्तिक -

भारतीय फलंदाजी क्रमवारीतील अव्वल चार फलंदाज निश्चित झाले आहेत, परंतु प्लेइंग इलेव्हनमध्ये यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत की दिनेश कार्तिक ( Rishabh Pant and Dinesh Karthik ) यांची निवड केली जाईल हे अद्याप निश्चित झालेले नाही. रवींद्र जडेजाच्या दुखापतीमुळे भारत कार्तिकपेक्षा पंतला प्राधान्य देऊ शकतो कारण तो डावखुरा फलंदाज आहे. कार्तिकला 'फिनिशर'च्या भूमिकेसाठी सामील करण्यात आले आहे. त्याला आशिया चषक स्पर्धेत फलंदाजीची संधी मिळाली नाही, परंतु संघ व्यवस्थापन त्याला पुढील दोन आठवड्यात क्रीजवर थोडा वेळ घालवण्याची संधी देऊ शकते.

दीपक हुड्डाच्या भूमिकेबाबत अस्पष्टता -

दीपक हुड्डा ( Deepak Hooda ) आशिया चषकातील सुपर फोरच्या सर्व सामन्यांमध्ये खेळला पण संघातील त्याच्या भूमिकेबाबत स्पष्टता नाही. आशिया चषकादरम्यान जडेजाच्या दुखापतीमुळे संघातील गोलंदाजी संतुलन बिघडले होते. भारताला पाच गोलंदाजांसह खेळावे लागले आणि गोलंदाजीमध्ये सहावा पर्याय नव्हता. भारताने हार्दिक पंड्या आणि जडेजाच्या जागी आलेला अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवल्यास त्याच्याकडे अतिरिक्त गोलंदाजीचा पर्याय असेल. बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल आणि हार्दिकच्या वेगवान गोलंदाजीमुळे अक्षर आणि युझवेंद्र चहलच्या रूपात दोन फिरकी गोलंदाज असू शकतात.

ऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नरसह काही प्रमुख खेळाडूंशिवाय भारतात -

ऑस्ट्रेलियाची परिस्थिती लक्षात घेऊन संघ व्यवस्थापन या सामन्यांसाठी संघ संयोजन तयार करेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नरसह काही प्रमुख खेळाडूंशिवाय भारतात आला आहे. वॉर्नरला विश्रांती देण्यात आली आहे तर मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस आणि मिचेल मार्श यांना दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. सातत्यपूर्ण खराब कामगिरीमुळे अलीकडेच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला कर्णधार अॅरॉन फिंचवर ( Captain Aaron Finch ) सर्वांचे लक्ष असेल. विश्वचषकापूर्वी तो फॉर्ममध्ये परतण्याचा प्रयत्न करेल. सिंगापूरकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या टीम डेव्हिडवरही सर्वांच्या नजरा असतील.

भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ ( Teams of India and Australia ) -

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया: अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), अ‍ॅश्टन आगर, टिम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरॉन ग्रीन, अ‍ॅडम झाम्पा, नॅथन एलिस, डॅनियल सीम्स आणि शॉन अ‍ॅबॉट.

हेही वाचा - IND vs AUS T20 Series : ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा रेकॉर्ड उत्कृष्ट, पण 'हे' आकडे टीम इंडियाला करतील अस्वस्थ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.