ETV Bharat / bharat

जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांचा राजीनामा, नितीश कुमार यांच्या हाती पुन्हा पक्षाची धुरा - ललन सिंह

Ashok Choudhary On Lalan Singh : बिहारच्या राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. ललन सिंह यांनी जेडीयूच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. यासोबतच नितीश कुमार यांनी जेडीयूच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.

Ashok Choudhary On Lalan Singh
जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांचा राजीनामा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2023, 3:32 PM IST

नवी दिल्ली Ashok Choudhary On Lalan Singh : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ललन सिंह यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला अखेर दुजोरा मिळाला आहे. दिल्लीत जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ललन सिंह यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ललन सिंह यांनीच पद सोडण्याची ऑफर दिली होती. आता मुख्यमंत्री नितीश कुमार स्वतः पक्षाची धुरा सांभाळणार आहेत.

ललन सिंह यांनी राजीनामा दिला : ललन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर बिहार सरकारचे मंत्री विजय कुमार चौधरी म्हणाले की, "नितीश कुमार यांनी अध्यक्षपद स्वीकारले आहे. आता राष्ट्रीय परिषदेची बैठक होणार असून हा प्रस्ताव मंजूर झाल्यास साहजिकच ते राष्ट्रीय अध्यक्ष असतील." तर पाच वाजता पत्रकार परिषदेत संपूर्ण माहिती दिली जाईल," असे के सी त्यागी यांनी सांगितले.

"ललन सिंह यांनी स्वतः सांगितले की, यापूर्वीही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसारच पद स्वीकारले होते. आता निवडणूक लढवण्यासाठी त्यांना सतत बाहेर राहावे लागणार आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना हे पद स्वीकारण्याची विनंती केली." - विजयकुमार चौधरी, बिहार सरकारमधील मंत्री

जेडीयूच्या बैठकीत मोठा निर्णय : गेल्या अनेक दिवसांपासून ललन सिंह यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र पक्षाच्या कोणत्याही नेत्याने यावर उघडपणे बोलणे टाळल्याचे दिसून आले. खुद्द ललन सिंग यांनी राजीनाम्याची चर्चा फेटाळून मीडियावर आपला राग काढला होता. मात्र आता दिल्लीत सुरू असलेल्या जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ललन सिंह यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला.

नितीश यांनी स्वीकारला राजीनामा : दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पाटण्यात नितीश कुमार यांना ललन सिंह यांच्या राजीनाम्याबाबत विचारण्यात आले असता त्यांनी याबाबत अस्पष्ट उत्तर दिले. तेव्हापासून यासंदर्भात सट्टाबाजार अधिकच तापला. आता जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ललन सिंह यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.

पक्षाची धुरा नितीश कुमारांच्या हाती : ललन सिंह यांच्या राजीनाम्याने नितीशकुमार यांनी पक्षाची धुरा आपल्या हातात घेतली आहे. ललन सिंह यांनी बैठकीत अध्यक्षपदासाठी नितीश कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे. नितीश यांचे विशेष मंत्री अशोक चौधरी यांनी याआधीच खुलासा केला होता.

हेही वाचा :

  1. नव्या वर्षाचं स्वागत जंगल सफारीनं करताय तर थांबा; 'या' ठिकाणी पर्यटकांना असणार बंदी
  2. पंतप्रधान मोदींचा अयोध्या दौरा; विमानतळासह 11 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं करणार उद्धाटन
  3. शिवसेना लोकसभेच्या २३ जागा लढवण्यावर ठाम, गल्लीबोळातील नेत्यांचं कोण ऐकणार - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.