नवी दिल्ली - कोरोनाचा प्रसार वाढतच असून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रजासत्ताक दिनासाठी अनेक ठिकाणावरून जवान दिल्लीत पोहचले आहेत. यात जवळपास 150 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रोटोकॉलनुसार दिल्लीत पोहचलेल्या जवानांची कोरोना चाचणी करण्यात आली. तब्बल 2 हजार जवान दिल्लीत दाखल झाले आहेत. बाधित रुग्णांना क्वारंटाईन केले आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन पुढील वर्षी म्हणजेच २०२१ च्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डॉमॅनिक राब यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. दोन्ही देशांतील संबंध एका नव्या उंचीवर नेण्यासाठी ही भेट महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे.
देशात कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 1 लाख 69 हजार 118 वर पोहचली आहे. तर 2 लाख 81 हजार 667 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रिकव्हरी रेट 95.78 वर आहे. तर 1.45 टक्के मृत्यू दर आहे. आतापर्यंत 97 लाख 40 हजार 108 जण कोरोनातून आतापर्यंत मुक्त झाले आहेत. याचबरोबर आतापर्यंत 1 लाख 47 हजार 343 मृत्यू झाले आहेत.