ETV Bharat / bharat

नौगाममध्ये लष्कराची दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार

श्रीनगरच्या नौगाम भागात बुधवारी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला, अशी माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे. तसेच, ऑपरेशन सुरू असून यापुढेही कारवाई चालू राहणार अशी माहिती त्यांनी दिली आहे. काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले ही चकमक पोलीस आणि भारतीय लष्कराच्या 50 RR (50 राष्ट्रीय रायफल्स) यांनी संयुक्तपणे केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By

Published : Sep 14, 2022, 9:42 PM IST

श्रीनगर - श्रीनगरच्या नौगाम भागात बुधवारी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला, अशी माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे. तसेच, ऑपरेशन सुरू असून यापुढेही कारवाई चालू राहणार अशी माहिती त्यांनी दिली आहे. काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले ही चकमक पोलीस आणि भारतीय लष्कराच्या 50 RR (50 राष्ट्रीय रायफल्स) यांनी संयुक्तपणे केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सध्या काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की, पोलिसांना दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस, लष्कराच्या संयुक्त पथकाने कारवाई सुरू केली. ज्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला. छापा टाकण्याची कारवाई अजूनही सुरू आहे. त्याच वेळी, या घटनेच्या काही तास आधी, दहशतवाद्यांनी लवामा जिल्ह्यातील मुख्य शहर असलेल्या त्रालमध्ये सीआरपीएफच्या बंकरवर हल्ला केला.

अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. तत्पूर्वी, दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सोमवारी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. या कारवाईत सहभागी असलेला एक जवानही जखमी झाला आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.