ETV Bharat / bharat

Tomato Face Pack : चेहऱ्यावरचे तेज कायम ठेवण्यासाठी लावा टोमॅटोचा 'हा' फेसपॅक - टोमॅटोचा पल्प आणि हळद

आजकाल धकाधकीच्या जीवनात चेहऱ्यावरचे तेज राहत नाही. प्रत्येकाला चेहऱ्यावर ताजेपणा हवा असतो. टोमॅटो आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे (Tomato is beneficial for health as well as skin). जर तुम्ही टोमॅटोचा पॅक रोज चेहऱ्यावर लावलात (apply tomato paste on your face) तर तुमची त्वचा निरोगी ठेवण्यास खूप मदत होते.

Tomato Face Pack
टोमॅटोचा पॅक
author img

By

Published : Nov 9, 2022, 1:41 PM IST

हैदराबाद: टोमॅटोमध्ये मँगनीज, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, झिंक, आयर्न, फॉस्फरस आणि कॉपर यासारखी खनिजे असतात. ही खनिजे शरिरासाठी फार उपयोगी असतात. टोमॅटो आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी खूप फायदेशीर (Tomato is beneficial for health as well as skin) आहे. तसेच टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट असल्यामुळे हृदयरोगासारख्या आणि कॅन्सरसारख्या आजरापासून बचाव करण्यासाठी सहायक ठरते. हाडांच्या बळकटीसाठी टोमॅटो फार उपयोगी पडते. जर तुम्ही टोमॅटोचा पॅक रोज चेहऱ्यावर लावलात (apply tomato paste on your face) तर तुमची त्वचा निरोगी ठेवण्यास खूप मदत होते.

मुलतानी माती आणि टोमॅटोचा पल्प: सौंदर्य तज्ज्ञांच्या मते, मुलतानी मातीमध्ये टोमॅटोचा पल्प मिसळून पेस्ट बनवा. आता ते चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.

बेसनामध्ये हळद, मध आणि टोमॅटोचा रस: बेसनाचा फेस पॅक बनवण्यासाठी एक चमचा बेसनामध्ये हळद, मध आणि टोमॅटोचा रस मिसळून पेस्ट बनवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या पेस्टमध्ये दहीही घालू शकता. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा, सुकल्यानंतर पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या त्वचेवर चमक येईल.

चंदनाची पावडर आणि टोमॅटो रस: तुम्ही चंदनाच्या (Sandalwood) फेस पॅकमध्येही टोमॅटो वापरू शकता. ते बनवण्यासाठी 2 चमचे चंदन पावडरमध्ये टोमॅटोचा रस मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट जास्त घट्ट होणार नाही याची काळजी घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर पाण्याने धुवा.

एक टोमॅटो, काकडीचा लगदा आणि मध: जर तुमची त्वचा तेलकट असेल तर काकडी आणि टोमॅटोचा पॅक तुमच्यासाठी उत्तम आहे. यासाठी तुम्हाला एक टोमॅटो आणि दोन चमचे काकडीचा लगदा, एक चमचा मध मिसळावे लागेल. ही पेस्ट चेहऱ्यावर 15-20 मिनिटे राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

टोमॅटोचा पल्प आणि हळद: टोमॅटोच्या पल्पमध्ये एक चमचा हळद मिसळून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. ते सुकल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. ते त्वचेला चमक देते, तसेच टॅनिंगला प्रतिबंध करते.

ऑलिव्ह ऑईल आणि टोमॅटो रस: कोरड्या त्वचेसाठी अर्ध्या टोमॅटोच्या रसात १ चमचा ऑलिव्ह ऑईल मिसळा. हा पॅक 15-20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.