जयपूर Jaipur Airport Threat Email : जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिल्याचं प्रकरण समोर आलं आहे. जयपूर विमानतळाच्या अधिकृत ईमेलवर जयपूर विमानतळ बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणारा मेल पाठवला आहे. जयपूर विमानतळ प्रशासनानं विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
केंद्रीय सुरक्षा एजन्सी सतर्क : या प्रकरणाची गंभीर दखल घेत, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सायबर तज्ञांची मदत घेतली जात आहे. जयपूर विमानतळावर सखोल तपास करण्यात येत आहे. जयपूर विमानतळासोबतच देशातील अनेक मोठ्या विमानतळांनाही बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. केंद्रीय सुरक्षा एजन्सीलाही सतर्क करण्यात आलं आहे.
जयपूर विमानतळाच्या मेल आयडीवर बॉम्बच्या धमकीचा मेल आला होता. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणा जयपूर विमानतळावर शोध मोहीम राबवत आहेत. मात्र शोध मोहिमेत काहीही संशयास्पद आढळलेलं नाहीये. संपूर्ण प्रकरण गांभीर्यानं घेत, विमानतळ व्यवस्थापन सतर्क आहे. जयपूर विमानतळासोबतच देशातील अनेक मोठ्या विमानतळांना बॉम्बनं उडवण्याची धमकी देणारा मेलही आला आहे - अनुराग गुप्ता, अधिकारी जयपूर विमानतळ
विमानतळ बॉम्बनं उडवून देण्याची धमकी : विमानतळ पोलीस ठाण्याच्या अधिकारी ममता मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी विमानतळ अधिकारी अनुराग गुप्ता यांना जयपूर विमानतळाच्या ईमेल आयडीवर धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे. त्या ईमेलमध्ये विमानतळ बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.
विमानतळावर शोधमोहीम सुरू : जयपूर विमानतळासोबतच देशातील अनेक मोठ्या विमानतळांना धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे. जयपूर विमानतळ प्रशासनाला धमकीचा मेल मिळाल्यानंतर तत्काळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर सुरक्षा यंत्रणांनी जयपूर विमानतळावर शोधमोहीम सुरू केली आहे. शोधमोहीम राबवून विमानतळावर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या सामानाचीही सखोल तपासणी केली जात आहे. सायबर टीमचीही मदत घेतली जात आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणाही या प्रकरणाचा तपास करत आहे.
हेही वाचा -