ETV Bharat / bharat

Amritpal in Punjab : गेला अमृतपाल कुणीकडे, पंजाब पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरुच..

अमृतपाल सिंग पंजाबमध्ये असल्याच्या माहितीच्या आधारे पंजाब पोलिसांनी काल होशियारपूरमध्ये शोध मोहीम राबवली. अमृतपाल आणि त्याचे साथीदार एका इनोव्हा कारमध्ये असल्याचा पोलिसांना संशय होता. या संशयाच्या आधारे पोलिसांनी होशियारपूरच्या मनरायान गावात रात्रभर शोध घेतला, मात्र कारमधील व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

Amritpal in Punjab
अमृतपाल सिंग पंजाबमध्ये
author img

By

Published : Mar 29, 2023, 8:36 AM IST

होशियारपूर (पंजाब) : अमृतपाल सिंग पंजाबमधून दिल्लीत पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर, तो आता पंजाबमध्ये परतल्याची माहिती समोर आली आहे. त्या माहितीच्या आधारे पंजाब पोलिसांनी त्याचा होशियारपूरमध्ये शोध सुरू केला. मंगळवारी रात्री उशिरा, होशियारपूरच्या मनरायान गावाला पंजाब पोलिसांच्या 700 हून अधिक जवानांनी वेढा घालत सर्वत्र बॅरिकेड्स लावले. काउंटर इंटेलिजन्सनुसार, अमृतपाल आणि त्याचे साथीदार इनोव्हा कारमध्ये असल्याचा संशय होता. त्यांनी ही इनोव्हा कार मनरायाना गावातील भाई चंचल सिंग गुरुद्वाऱ्याजवळ सोडून पळ काढला आहे.

पोलिसांनी संपूर्ण गावाची झडती घेतली : माहितीनुसार, होशियारपूरच्या फगवाडा रोडवर फगवाड्याकडून येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा वाहनाला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. ते पाहताच चालकाने गाडी बायपासजवळील मनरायान गावात वळवली. त्यानंतर पोलिसांनी फगवाडा ते होशियारपूर या कारचा पाठलाग केला. कारमधील चार जण मनरायन गावातील गुरुद्वारा साहिबमध्ये पोहोचले आणि त्यांनी गाडी तेथेच सोडून तेथून पळ काढला. यानंतर पोलिसांनी गावात शोधमोहीम राबवली. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कोणालाही गावात प्रवेशावर बंदी घातली. रात्री एक वाजेपर्यंत पोलिसांनी गावातील प्रत्येक घराची झडती घेतली.

पोलिसांनी इनोव्हा कार जप्त केली : पोलिस कारवाई करत असताना मध्यरात्री 12 नंतर जहान खेल अकादमीमधून आणखी 200 जवानांना बोलावण्यात आले. तेथे पोलिसांनी संशयित इनोव्हा कार जप्त केली. मनरायन गावचे सरपंच जसविंदर सिंह यांनी सांगितले की, बाबा भाई चंचल जी गुरुद्वारा जवळ 3 संशयित तरुण दिसले होते. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण गाव घेरले. ते म्हणाले की, पोलिसांनी गुरुद्वारा साहिबजवळून एक इनोव्हा कार जप्त केली आहे. मात्र कार मधील व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी होशियारपूर पोलीस रात्री उशिरापासून संवेदनशील ठिकाणी नाकाबंदी आणि तपासणी मोहीम राबवत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कारवाई करताना फगवाडा येथून 2 जणांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : Chat GPT In Court : न्यायालयाने पहिल्यांदाच चॅट जीपीटीच्या मदतीने दिला निकाल!, जाणून घ्या भविष्यात किती प्रभावी ठरेल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.