ETV Bharat / bharat

Aligarh Love Story : प्रेमापोटी तरुणानं केलं धर्मांतर.. प्रेयसीनं केला विश्वासघात अन्... - उत्तर प्रदेशातील अलीगढ

Aligarh Love Story : उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये एका तरुणानं प्रेयसीसाठी धर्म परिवर्तन केलं. मात्र तरीही तो तिच्याशी लग्न करू शकला नाही. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी...

Aligarh Love Story
Aligarh Love Story
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2023, 10:41 PM IST

अलीगढ (उत्तर प्रदेश) Aligarh Love Story : उत्तर प्रदेशातील अलीगढमधून एक विचित्र प्रेमकहाणी समोर आलीय. येथं एका तरुणानं प्रेमापोटी धर्म बदलून प्रेयसीचा धर्म स्वीकारला. मात्र, तिनं त्याची फसवणूक केली. त्यानंतर तरुणानं तिला मिळवण्यासाठी सर्व युक्त्या वापरल्या, मात्र त्याला यश आलं नाही.

प्रेमापाई तुरुंगात जावं लागलं : या तरुणानं प्रेयसीच्या प्रेमापोटी खतनाही करून घेतला. धर्मांतरानंतर तो नमाज अदा करण्यासाठी मशिदीत जाऊ लागला. मात्र तरीही ती त्याला मिळाली नाही. हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचल्यानंतर पोलिसांनी तरुणावर विनयभंग आणि शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली कारवाई केली. तरुणाच्या वडिलांनी आपल्या मुलाचं धर्मांतरासाठी ब्रेनवॉश केल्याचा आरोप केला, परंतु पोलिसांनी त्यांचं ऐकलं नाही. त्यानंतर प्रेमापाई त्या तरुणाला तुरुंगात जावं लागलं.

दोन वर्षांपासून सुरू होते प्रेमप्रकरण : हरदुआगंज पोलीस ठाण्याच्या जलाली भागातील एका गावात ही घटना घडली. येथे बीएड केलेल्या धर्म सिंह या तरुणाची परिसरात राहणाऱ्या मुस्लिम तरुणीशी ओळख झाली. दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले. त्यांनी एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली. दोन वर्ष हे सर्व चालू होतं. त्यानंतर धर्म सिंहनं मुलीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा तिनं सांगितलं की, तिचे कुटुंबीय तिचं लग्न दुसऱ्या धर्मात करणार नाहीत. हे ऐकून धर्म सिंह तिला मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार झाला.

धर्म सिंह बनला अब्दुल रहमान : यानंतर या तरुणानं धर्म परिवर्तन केलं. त्यानं आपलं नाव 'धर्म सिंह' वरून बदलून 'अब्दुल रहमान' असं केलं. त्यानं धर्मांतरासंदर्भात मुलीच्या वडिलांचीही भेट घेतली. धर्म सिंह यानं सांगितलं की, तो मुस्लिम परिसरात भाड्याच्या खोलीत राहू लागला. जामा मशिदीत जाऊन त्यानं धर्मांतर केलं. तसेच तो जमातमध्ये जाऊन मुस्लीम समाजाच्या चाली-रिती शिकू लागल्याचही त्यानं सांगितलं.

धर्म बदलल्यानंतरही मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिला : धर्म सिंहची दोन महिन्यांपूर्वी खतना झाली. त्यानंतर जेव्हा त्यानं आपली प्रेयसी आणि तिच्या कुटुंबियांसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा त्यांनी नकार दिला. यासोबतच कुटुंबीयांनी मुलीला घराबाहेर पडण्यास बंदी घातली. त्यानंतरही धर्म सिंहनं मुलीला भेटण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे गोष्टी बिघडल्या. मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, धर्म सिंह नाटक करत होता. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलीचं लग्न दुसऱ्या ठिकाणी निश्चित केलं.

पोलिस कोठडीत तरुणानं सांगितली संपूर्ण कहाणी : त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. धर्म सिंह बळजबरीनं लग्न करण्याची धमकी देत ​​असल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात दिली. 'जर तू माझी होणार नसशील तर तू कोणाचीच बायको बनू शकणार नाहीस', अशी धमकी धर्म सिंहनं दिल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून धर्म सिंहला विनयभंग आणि शांतता भंग करण्याच्या आरोपाखाली अटक केली.

मुलाचं ब्रेनवॉश केलं : या प्रकरणी धर्म सिंहच्या वडिलांनी सांगितलं की, मुलीच्या वडिलांनी लग्नाच्या बहाण्यानं त्यांच्या मुलाचं ब्रेनवॉश केलं. वडिलांनी हरदुआगंज पोलिस ठाण्यात मुलाच्या धर्मांतराचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी ऐकले नाही. आरोपी तरुण धर्म सिंहवर शांतता भंग आणि छेडछाड केल्याच्या आरोपाखाली कारवाई करण्यात आली आहे, असं हरदुआगंज पोलीस स्टेशनचे प्रभारी रवी चंद्रवाल यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. Indore Religion Conversion : 9 वर्षीय मुलाचे धर्मांतर, आईच्या प्रियकराने धर्मांतर करून वडिलांच्या जागी लिहिले स्वत:चे नाव!
  2. Muslim Boy Converted To Hindu : हिंदू मुलीशी लग्न करण्यासाठी मुस्लिम मुलाने केले धर्मांतर, लग्नानंतर मुलीची घटस्फोटाची मागणी!
  3. Religion conversion case : धर्म बदलण्याकरिता बापाचा मुलावर दबाव.. मुलाच्या तक्रारीनंतर भोंदुबाबाला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.