रायपूर (छत्तीसगड) : नवा रायपूर येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना कॉंग्रेस नेते प्रताप सिंह बाजवा म्हणाले की, 'पंजाब नेहमीच देशाचा कोहिनूर राहिला आहे. हे राज्य अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर पंजाबमध्ये पंजाबी सतत समस्यांचा सामना करत आहेत. आता पंजाब रिकव्हरीच्या दिशेने वाटचाल करत होता, दरम्यान, हे सर्व पुन्हा सुरू झाले आहे. अजनाल्यात परिस्थिती बदलली आहे. हा भाग अमृतसर सीमेवर आहे. बीएसएफने येथे आपली उपस्थिती वाढवली आहे.
'असे 75 वर्षांत पाहिले नाही' : प्रताप सिंह बाजवा पुढे म्हणाले की, 'अमृतपाल सिंहच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याचा साथीदार तुफान सिंह याला अटक करण्यात आली. या अटकेनंतर अमृतसिंहने मी त्याला सोडवण्यास येतो आहे, अशी चेतावणी दिली होती. त्याने त्याच्या सहकाऱ्याला वाचवण्यासाठी अजनाल्याच्या पोलीस ठाण्यावर हल्ला केला. मी असे ७५ वर्षात कधीच पाहिलं नाही. या आधीही वाईट काळ होता पण त्या काळातही असं कधी झालं नाही.
'राज्यातील जनतेचे रक्षण कोण करणार?' : या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्र्यांच्या मौनाबाबत बाजवा म्हणाले की, जर मुख्यमंत्री भगवंत मान यांना वाटत असेल की गप्प राहून काही होईल तर तसे काहीही होणार नाही. पंजाबची जनता हे सहन करणार नाही. राज्यातील जनतेचे रक्षण कोण करणार? या बाहेरच्या लोकांशी लढण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. या लोकांनी गुरू ग्रंथ साहिबचे रूपही सोबत घेतले आहे, असे भाजपने म्हटले आहे. असे पहिल्यांदाच घडले आहे.'
'भगवंत मान आणि भाजपला शांतता बिघडवायची आहे' : ते पुढे म्हणाले की, 'या घटनेवर शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीची जबाबदारीही निश्चित व्हायला हवी. अमृतपाल जेव्हा गुरू ग्रंथ साहिब घेऊन पोलिस स्टेशनला जात होता तेव्हा त्याला विरोध व्हायला हवा होता. ग्रंथ साहिब अशा गैरकृत्यांमध्ये ढाल बनू नये. भगवंत मान आणि भाजपला पंजाबची शांतता बिघडवायची आहे. मात्र आम्ही हे कधीही होऊ देणार नाही.'
'8 ऑक्टोबरला डीजीपींना पत्र लिहिले' : काँग्रेस नेते अमरिंदर सिंह राजा म्हणाले की, 'मी 8 ऑक्टोबरलाच डीजीपींना पत्र लिहून अमृतपालच्या कृतीवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. त्याच्या लोकांना शस्त्र परवाने दिले जात आहेत. त्यांचे लोक सतत खुलेआम शस्त्रास्त्रे घेऊन फिरत आहेत. पोलिस ठाणे ताब्यात घेण्याची ही पहिलीच घटना आहे. राज्य सरकार अक्षम आहे. ते केंद्र सरकारच्या दबावाखाली आहे. त्यामुळे अशा घटनांना प्रोत्साहन दिले जात आहे.'
'ही पंजाबींची भावना नाही' : खलिस्तानच्या प्रश्नावर सर्व नेत्यांनी एका मताने सांगितले की, 'अमृतपालची भावना ही सर्व पंजाबींची भावना नाही. पंजाबींना खलिस्तान नव्हे तर शांत हिंदुस्थान हवा आहे.' या वेळी नेत्यांनी शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापनावर दुटप्पीपणाचा आरोप केला आणि ते म्हणाले की, 'कोणी गुरु ग्रंथ साहिब महाराजांना भांडणाच्या ठिकाणी नेणार नव्हते, मात्र अमृतपालने ते कसे नेले? अकाली तख्तला या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावे लागेल.
घटनेवरून राजकारण तापले : गुरुवारी खलिस्तान समर्थक संघटना वारिस पंजाबशी संबंधित हजारो लोकांनी अमृतसरमधील अजनाला पोलिस स्टेशनवर हल्ला केला. त्यांच्या हातात तलवारी आणि बंदुका होत्या. हे लोक संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंह याच्या निकटवर्तीय लवप्रीत सिंग तुफानच्या अटकेविरोधात आंदोलन करत होते. या हल्ल्यानंतर पंजाब पोलिसांनी दबावाखाली येऊन आरोपींना सोडण्याची घोषणा केली.