ETV Bharat / bharat

Meeting of BJP National Executive: पंतप्रधानांची 'KCR' यांच्यासह घराणेशाहीवर जोरदार टीका

author img

By

Published : Jul 3, 2022, 9:18 PM IST

Updated : Jul 3, 2022, 10:34 PM IST

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आज रविवार (दि. 3 जुलै)रोजी हैदराबाद येथे जाहीर सभेला संबोधित केले. यामध्ये पंतप्रधान मोदींनी तेलंगणाच्या सांस्कृतिक कामगिरीचा आणि इतिहासाचा उल्लेख केला. ( Meeting of BJP National Executive ) ते म्हणाले की, येथील लोक त्यांच्या समर्पण आणि मेहनतीसाठी ओळखले जातात. आठ वर्षांत आम्ही प्रत्येक भारतीयाचे जीवन सुकर करण्याचे काम केले आहे. विकासाला प्रत्येक क्षेत्रात नेण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत असेही ते म्हणाले आहेत. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, 'KCR' यांना त्यांचा मुलगा केटीआरच्या रोजगाराची चिंता आहे. त्यांना आपल्या मुलाला मुख्यमंत्री करण्याची चिंता आहे जनतेची नाही अशी टीका शहा यांनी यावेळी केली आहे

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपल्यानंतर पंतप्रधान मोदींनी हैदराबाद येथे जाहीर सभेला संबोधित केले

हैदराबाद (तेलंगणा) - तेलंगणात कला, कौशल्य, मेहनत भरपूर आहे. तेलंगणा हे प्राचीन आणि पराक्रमाचे पवित्र ठिकाण आहे. हैदराबाद शहर ज्याप्रमाणे प्रत्येक प्रतिभेच्या अपेक्षांना नवे उड्डाण देते. त्याचप्रमाणे भाजपही देशाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटत आहे. ( Prime Minister in Hyderabad )देशातील महिलांचेही आज आपले जीवन सुकर झाले आहे, त्यांच्यासाठी सोयी-सुविधा वाढल्या आहेत असही ते म्हणाले आहेत. त्यामुळे महिला देशाच्या विकासात अधिक योगदान देऊ शकतात. ( Prime Minister Criticized KCR In Hyderabad ) तेलंगणातील गरिबांना मोफत रेशन मिळावे, गरिबांना मोफत उपचार मिळावेत, यासाठी भाजप सरकार प्रयत्न करते असही पंतप्रधान म्हणाले आहेत. आज सर्वांचा विकास होत असल्यामुळे आज देशातील सर्वसामान्य नागरिकाचा भाजपवर इतका विश्वास आहे असही ते म्हणाले आहेत.

भाजपला मिळालेला जनसमर्थन सातत्याने वाढत आहे - तेलंगणात भाजपला मिळालेला जनसमर्थन सातत्याने वाढत आहे. याची आणखी एक झलक ग्रेटर हैदराबादच्या निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाल्यावर पाहायला मिळाली. (2019 )च्या निवडणुकीत तेलंगणात भाजपला मिळालेला जनसमर्थन सातत्याने वाढत आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

तेलंगणातील शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य व्हावे - तेलंगणाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सर्वोत्कृष्ट कनेक्टिव्हिटी पोहोचली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. तेलंगणातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी गेल्या 8 वर्षांत दुप्पट झाली आहे. (2014)मध्ये तेलंगणा राज्यात सुमारे 2,500 किमी राष्ट्रीय महामार्ग होते, आज 5 हजार किमीचे जाळे आहे. तेलंगणातील शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांना त्यांच्या उत्पादनाला जास्तीत जास्त भाव मिळावा, हा आमचा सतत प्रयत्न असतो असही ते म्हणाले आहेत.

पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी काम सुरू केले - तेलंगणामध्ये, केंद्र सरकार पाण्याशी संबंधित (35,000)कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 5 मोठ्या प्रकल्पांवर काम करत आहे. रामागुंडम खत कारखाना स्वावलंबी भारत मोहिमेला बळ देत आहे. गेल्या दशकांत बंद पडलेल्या देशातील अनेक खत कारखान्यांपैकी हाही एक होता. 2015 मध्ये, आम्ही सुमारे साडेसहा हजार कोटींची गुंतवणूक करून ते पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी काम सुरू केले आहेत असही ते म्हणाले आहेत.

गरीब कुटुंबातील मातांची स्वप्ने साकार होतील - नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आम्ही स्थानिक भाषेतील अभ्यासाला प्राधान्य दिले आहे. जेव्हा तेलुगूमध्ये तंत्रज्ञान आणि वैद्यकीय शिक्षण मिळेल, तेव्हा तेलंगणातील खेड्यापाड्यातील गरीब कुटुंबातील मातांची स्वप्ने साकार होतील. तेलंगणा हे देशातील संशोधन आणि नवोपक्रमाचे मोठे केंद्र आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

कार्यक्रमात भाजपचे अनेक दिग्गज नेतेही सहभागी - लोकांना संबोधित करताना गृहमंत्री अमित शहा यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि त्यांचा मुलगा केटीआर यांच्यावर निशाणा साधला. शाह म्हणाले की, हैदराबादचे नाव 'भाग्यनगर' असे करणार आहोत. शहा म्हणाले की, येथील मुख्यमंत्री मुख्यमंत्री कार्यालयात येतच नाहीत. दरम्यान, लवकरच त्यांची खुर्ची जाईल असही ते म्हणाले आहेत. तसेच, अशा परिस्थितीत ते जनतेचे भले कसे करणार असा प्रश्नाही शहा यांनी उपस्थित केला आहे.

अनेक राजकीय पक्ष आपले अस्तित्व वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत - तेलंगणाचा विकास खुंटला असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे येथे दुहेरी इंजिन सरकारची गरज आहे. याआधी रविवारी पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला आणि म्हटले की, देश घराणेशाही आणि घराणेशाहीच्या राजकीय पक्षांना पूर्णपणे कंटाळला आहे. अशा पक्षांना आता टिकणे कठीण आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान असेही म्हणाले की, आजकाल अनेक राजकीय पक्ष आपले अस्तित्व वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असही ते म्हणाले आहेत.

आमच्या पक्षावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांच्या पक्षाची काय अवस्था आहे? - विविधतेच्या बळावर आपल्या संघटनेचा संकल्प देशात विस्तारूया. तरुण पिढीला पुढे आणण्याचे आवाहन करत मोदींनी कार्यकर्त्यांना अधिकाधिक तरुणांशी संपर्क साधून त्यांना पक्षाशी जोडण्यास सांगितले. भाजपच्या लोकशाही चारित्र्यावर टीका करणाऱ्या पक्षांवरही पंतप्रधानांनी निशाणा साधला आणि 'आमच्या पक्षावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांच्या पक्षाची काय अवस्था आहे? त्यांच्या संघटनात्मक रचनेत किती लोकशाही आहे?' हे आपण पाहत आहात असही पंतप्रधान म्हणाले आहेत.

हेही वाचा - देशातील महागाई, बेरोजगारीला मोदी नव्हे तर अकबर आणि औरंगजेब जबाबदार : ओवैसी

Last Updated : Jul 3, 2022, 10:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.