भोपाळ : मध्य प्रदेशच्या भोपाळ आणि ग्वाल्हेरमध्ये ब्लॅक आणि व्हाईट अशा दोन्ही फंगसची लागण झालेले एक-एक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत देशात केवळ ब्लॅक वा व्हाईट फंगसची लागण झालेले रुग्ण आढळून येत होते. दोन्ही प्रकारच्या फंगसची लागण झालेले हे पहिलेच रुग्ण आहेत.
भोपाळच्या हमीदिया रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका ४२ वर्षीय रुग्णाला या दोन्ही फंगसची लागण झाल्याचे दिसून आले. या व्यक्तीच्या श्वासनलिकेच्या वरच्या भागात व्हाईट, तर खालच्या भागात ब्लॅक फंगसची लागण झाली आहे.
त्यापूर्वी, ग्वाल्हेरमध्येही एका रुग्णाला दोन्ही फंगसची लागण झाल्याचे दिसून आले होते. काही दिवसांपूर्वी या रुग्णाला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनामधून बरे झाल्यानंतर या रुग्णाला डोळ्यांमध्ये सूज येऊ लागली होती. त्यानंतर तपासणी केली असता, ब्लॅक आणि व्हाईट दोन्ही फंगसची लागण झाल्याचे समोर आले होते. डॉक्टरांनी या रुग्णाचे ऑपरेशन केल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा : औषध आणायला गेलेल्या युवकाला जिल्हाधिकाऱ्याने मारली कानाखाली; व्हिडिओ व्हायरल..