ETV Bharat / bharat

Shraddha Murder Case : आफताबची झाली पॉलीग्राफ टेस्ट; बुधवारी नार्को टेस्ट, दिल्ली पोलीस वसईत तळ ठोकून - आफताबची नार्को टेस्ट

श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबची पॉलीग्राफ (Shraddha Murder Case) चाचणी मंगळवारी सायंकाळी उशिरा सुरू झाली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबची रोहिणी एफएसएल लॅबमध्ये पॉलीग्राफ चाचणी सुरू झाली आहे.

Shraddha Murder Case
Shraddha Murder Case
author img

By

Published : Nov 22, 2022, 9:01 PM IST

Updated : Nov 22, 2022, 10:51 PM IST

नवी दिल्ली - दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबची पॉलीग्राफ (Shraddha Murder Case) चाचणी मंगळवारी सायंकाळी उशिरा सुरू झाली होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबची रोहिणी एफएसएल लॅबमध्ये पॉलीग्राफ चाचणी सुरू झाली होती. रात्री उशिरापर्यंत झालेल्या या टेस्टमध्ये काय समोर येते हे पाहावे लागणार आहे. नार्को चाचणी उद्या म्हणजेच बुधवारी होणार आहे. नार्को टेस्ट आणि पॉलीग्राफ टेस्टच्या माध्यमातून काही पुरावे जप्त करण्यात यश येईल, जे आफताबला मारेकरी सिद्ध करण्यात महत्त्वाचा दुवा ठरेल, अशी आशा पोलिसांना आहे.

नार्को टेस्ट करण्यास परवानगी - दिल्ली पोलिसांनी नार्को चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. मंगळवारी त्यांनी कोर्टाकडे पॉलीग्राफ चाचणी करण्याची परवानगी मागितली होती. नार्को टेस्ट आणि पॉलीग्राफ टेस्टच्या माध्यमातून काही पुरावे जप्त करण्यात यश येईल, जे आफताबला मारेकरी सिद्ध करण्यात महत्त्वाचा दुवा ठरेल, अशी आशा पोलिसांना आहे.

आफताबच्या पोलीस कोठडीत वाढ - आज दिल्लीतील साकेत कोर्टाने आफताबच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे. याआधीही पोलिसांनी त्याला दोनदा ५-५ दिवसांच्या कोठडीत पाठवले होते. मात्र, या 10 दिवसांतही पोलिसांना अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. तत्पूर्वी दुपारी दिल्ली उच्च न्यायालयाने श्रद्धा हत्याकांडाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. याचबरोबर याचिकाकर्त्याला दंडही ठोठावण्यात आला आहे. या युक्तिवादाचा विचार करण्यासाठी आम्हाला एकही योग्य कारण सापडले नाही, असे न्यायालयाचे म्हणणे आहे.

  • इस विषय(नार्को और पॉलीग्राप टेस्ट) पर दिल्ली पुलिस और FSL की टीमें काम कर रही हैं। बहुत ही जल्द सभी जांच हो जाएंगे, प्रक्रिया शुरू कर दी गई है। पॉलीग्राफ टेस्ट सच निकलवाने का एक तरीका है। इस टेस्ट में 1-2 दिन का समय लगता है: श्रद्धा हत्याकांड पर संजीव गुप्ता, FSL सहायक निदेशक pic.twitter.com/x6tSqiXIPL

    — ANI_HindiNews (@AHindinews) November 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सीबीआय चौकशीची मागणी फेटाळली : दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या वकिल जोशीनी तुली यांनी ही याचिका दाखल केली होती. ती कोणत्या आधारावर ही जनहित याचिका दाखल करत आहे, असे न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारले. न्यायालयाने याचिकाकर्त्याला दंड ठोठावत याचिका फेटाळून लावली. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.

श्रद्धाचे रुट कॅनल करणाऱ्याचा शोध - श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी दिल्ली पोलीस वसईत तळ ठोकून थांबले आहेत. कालपर्यंत दिल्ली पोलिसांनी 17 जणांचे जबाब नोंदवले. मात्र दिल्लीत सुरू असणाऱ्या तपासात दिल्ली पोलिसांना मुंबईची जोडलेले धागेदोरे सापडले आहेत. श्रद्धा वालकरचा जबडा दिल्ली पोलिसांनी जप्त केला असून त्यावरून श्रद्धाने रूट कॅनल केले असल्याचे निदर्शनास आले आहे. हे रूट कॅनल तिने मुंबईतील डॉक्टरांकडून करून घेतल्याची माहिती आफताबकडून मिळाली त्यामुळे दिल्ली पोलीस आता मुंबईतील हा डॉक्टर कोण आहे, याचा शोध घेत आहेत. जेणेकरून त्या डॉक्टरचा जबाब नोंदवला जाऊ शकेल आणि तपासासाठी अधिक माहिती मिळू शकेल.

  • Shraddha Murder Case | Delhi Police today recorded the statements of three friends of accused Aftab, in Vasai Crime Branch, Palghar district. Statements of 17 people recorded by Delhi Police so far: Delhi Police

    — ANI (@ANI) November 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आफताबच्या तीन मित्रांचे नोंदवले जबाब - दिल्ली पोलिसांनी आज पालघर जिल्ह्यातील वसई गुन्हे शाखेत आरोपी आफताबच्या तीन मित्रांचे जबाब नोंदवले. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 17 जणांचे जबाब नोंदवले आहेत.

Last Updated : Nov 22, 2022, 10:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.