ETV Bharat / bharat

Air India Urination Case : आरोपी शंकर मिश्रा याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी - शंकर मिश्रा याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

एअर इंडियाच्या विमानात महिलेशी गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या शंकर मिश्रा (Accused Shankar Mishra) याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Shankar Mishra remanded to judicial custody). पोलिसांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, ती न्यायालयाने नाकारली. पोलिसांनी त्याला बेंगळुरू येथून अटक केली होती. (shankar mishra air india case) (Air India peeing case)

Shankar Mishra
शंकर मिश्रा
author img

By

Published : Jan 7, 2023, 6:37 PM IST

शंकर मिश्रा याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विमानात लघवी केल्याचा आरोप असलेल्या शंकर मिश्रा (Accused Shankar Mishra) याला पतियाळा हाऊस कोर्टाने शनिवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. (Shankar Mishra remanded to judicial custody). आरोपीला दिल्ली पोलिसांनी पटियाला हाऊस कोर्टात हजर केले आहे. पोलिसांनी आरोपीच्या 3 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती, जी या परिस्थितीत आरोपीची शारीरिक उपस्थिती अनिवार्य नसल्याचे सांगत न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडीत पाठवले जाणार नाही. महानगर दंडाधिकारी अनामिका म्हणाल्या की, जनतेच्या दबावाचा या प्रकरणाच्या तपासावर परिणाम होऊ नये यासाठी न्यायालयाने मिश्रा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. (shankar mishra air india case) (Air India peeing case)

  • Air India passenger urinating case of Nov 26, 2022 | Delhi's Patiala House Court sends accused Shankar Mishra to 14 days judicial custody pic.twitter.com/3Kfpl8dTz8

    — ANI (@ANI) January 7, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महिलेने टाटा समूहाच्या अध्यक्षांना लिहिले होते पत्र : कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, कोर्टात इतर साक्षीदारांची चौकशी करण्यासाठी आरोपीची उपस्थिती अनिवार्य नाही. त्याला पोलीस कोठडीत न घेता CrPC कलम 164 चे बयान देखील नोंदवले जाऊ शकते. नोव्हेंबरमध्ये एअर इंडियाच्या विमानात मद्यधुंद अवस्थेत एका 70 वर्षीय महिलेवर लघवी केल्याच्या आरोपावरून मिश्रा यांना दिल्ली पोलिसांनी बेंगळुरू येथे अटक केली. टाटा समूहाच्या अध्यक्षांना महिलेने लिहिलेले पत्र मीडियासमोर आल्याने ही बाब समोर आली. अमेरिकन कंपनी वेल्स फार्गोमध्ये काम करणाऱ्या मिश्रा यांना कंपनीने त्यांच्यावरील आरोप अत्यंत लज्जास्पद असल्याचे सांगत त्यांना कंपनीतून काढून टाकण्यात आले आहे.

तपासात सहकार्य केले नाही : काल बेंगळुरू येथून अटक केल्यानंतर मिश्राला दिल्लीत आणण्यात आले. मिश्रा यांनी तपासात सहकार्य केले नाही, असे सरकारी वकीलांनी म्हटले आहे. वकील म्हणाले, 'आम्ही त्यांला बेंगळुरू येथून अटक केली. तपास अजूनही सुरू आहे. आम्हाला अनेक लोकांची चौकशी करायची आहे.' न्यायाधीशांनी मात्र क्रू मेंबर्स आणि इतर साक्षीदारांच्या चौकशीसाठी मिश्राच्या कोठडीची आवश्यकता नसल्याचे सांगितले. 'तुम्ही म्हणत आहात की क्रू मेंबर्सची चौकशी झाली पाहिजे. यासाठी तुम्हाला त्याची (मिश्राची) गरज का आहे? त्याला न्यायालयीन कोठडीत का पाठवता येत नाही,' असा सवाल न्यायाधीशांनी केला.

एकच गुन्हा अजामीनपात्र : मिश्रा यांचे वकील अ‍ॅडव्होकेट मनु शर्मा यांनी सांगितले की, मिश्रा यांच्यावर लावण्यात आलेल्या गुन्ह्यांपैकी फक्त एकच अजामीनपात्र आहे. पीडितेच्या वकिलाने सांगितले की, ज्या फ्लाइटमध्ये ही घटना घडली त्या फ्लाइटचे क्रू मेंबर्सही याला जबाबदार आहेत. न्यायमूर्तींनी उत्तर दिले, 'फक्त सार्वजनिक दबाव निर्माण झाला आहे, तसे करू नका,' पक्षकारांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने दिल्ली पोलिसांचा पोलिस कोठडीचा अर्ज फेटाळून लावला आणि मिश्रा यांना 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मिश्रा यांनी स्वतंत्र जामीन अर्जही दाखल केला ज्यावर न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली. जामीन याचिकेवर 11 जानेवारीला सुनावणी होणार आहे.

काय आहे प्रकरण : 26 नोव्हेंबरला न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये एका व्यक्तीने वृद्ध महिलेवर लघवी केली होती. लघवी करणाऱ्या व्यक्तीचे नाव शंकर मिश्रा असे असून तो एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतो. दिल्ली पोलिसांच्या सांगण्यावरून इमिग्रेशन ब्युरोने त्याच्याविरुद्ध लुक आउट सर्कुलर (LOC) जारी केले होते. तो मुंबईचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

महिलेने माफ केल्याचा वकिलाचा दावा : आता आरोपीच्या वकिलाने दावा केला आहे की महिलेने कथित कृत्य माफ केले आहे आणि तक्रार दाखल करण्याचा तिचा कोणताही हेतू नव्हता. यासोबतच नुकसान भरपाई म्हणून 15 हजार रुपयेही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, शंकर मिश्रा यांच्या वडिलांनी शुक्रवारी दावा केला की, त्यांच्या मुलावरील आरोप 'पूर्णपणे खोटे' आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.