ETV Bharat / bharat

आपचं गुजरात मॉडेल; विधानसभेतील सर्व जागा लढवण्याची घोषणा

author img

By

Published : Jun 14, 2021, 3:58 PM IST

आम आदमी पार्टी (आप) 2022 मध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढणार असल्याची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. केजरीवाल यांनी आज पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं.

केजरीवाल
केजरीवाल

अहमदाबाद - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी एकदिवसीय गुजरात दौर्‍यावर आहेत. आम आदमी पार्टी (आप) 2022 मध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढणार असल्याची घोषणा केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केली. आतापासून पक्षाने निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली असल्याचे त्यांनी म्हटलं. केजरीवाल यांनी आज पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं.

आज काँग्रेस भाजपच्या खिशात आहे. गुजरातमध्ये शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सरकारी शाळा वाईट स्थितीत आहेत. व्यापारी वर्ग घाबरला आहे. यासाठी दोन्ही पक्ष जबाबदार आहेत. गुजरात मॉडेलची आज स्थिती खराब असून आम्ही त्यात सुधारणा करू. गुजरातला दिल्ली मॉडेलपेक्षा वेगळं असे एक मॉडेल देऊ. लोकांचे प्रश्न मांडू, असे आश्वासन केजरीवाल यांनी दिले. तसचे गुजरातमधील नागरिकांसाठी सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसविरोधात आप हा विश्वासार्ह पर्याय आहे. गुजरातमध्ये लवकरच बदल होईल, असे केजरीवाल म्हणाले.

केजीरवाल यांनी केलं गुजरातींच कौतूक -

देशाच्या स्वातंत्र्य आणि त्यानंतरच्या उभारणीतील गुजरातीयांच्या योगदानाचे केजरीवाल यांनी कौतुक केले. देशाचे स्वातंत्र्य मिळविण्यात केवळ गुजराती नेतेच नव्हे. तर गुजराती लोकांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर सरदारांनी 500 हून अधिक राज्ये एकत्रित करून देशाला खऱ्या अर्थाने एकत्र केले. सरदारांच्या योगदानाशिवाय आज भारत शक्य झाला नसता, असे केजरीवाल म्हणाले.

सुरत महानगपालिकेत 27 जागा जिंकल्या होत्या -

केजरीवाल गुजरातमध्ये पोहोचण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्यांनी फेब्रुवारीत सुरतमध्ये रोड शो केला होता. तेथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या आम आदमी पक्षाने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत सुरत महानगपालिकेत 27 जागा जिंकल्या होत्या. आम आदमी पक्ष प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयास आला. नुकताच सूरत भाजपाचे सुमारे 300 कार्यकर्ते आम आदमी पक्षात दाखल झाले आहेत.

गुजरात विधानसभा निवडणूक?

गुजरातमध्ये 2017 ला विधानसभा निवडणूक पार पडली होती. गुजरात विधानसभेच्या 182 जागांसाठी मतदान झाले. गेले 22 वर्षे सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला काँग्रेस पक्षाने मोठे आव्हान दिले होते. पक्षाध्यक्ष राहुल गांधी तसेच पंततप्रधान मोदी ह्यांनी गुजरातमध्ये कसून प्रचार केला होता. 18 डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालांत भारतीय जनता पक्षाने 99 जागा जिंकून बहुमत मिळविले होते. भाजपाने काँग्रेसला पिछाडीवर टाकत विजय मिळवला होता.

हेही वाचा - पाच वर्षे गुजरातची सत्ता द्या, भाजपाची २५ वर्षे विसरून जाल - अरविंद केजरीवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.