नवी दिल्ली : दिल्ली दारू घोटाळ्यात आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना 5 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह यांना ईडीनं गुरुवारी न्यायालयात हजर केलं. तपास यंत्रणेनं त्यांची 10 दिवसांची कोठडी मागितली होती. ज्याला संजय सिंह यांचे वकील मोहित माथूर यांनी विरोध केला.
सिंह यांना 5 दिवसांची ईडी कोठडी : या प्रकरणात खासदाराचे नाव नसताना 10 दिवसांचा रिमांड मागणे चुकीचं असल्याचं ते म्हणाले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं संजय सिंग यांचा 5 दिवसांची ईडी कोठडी सुनावलीय. ईडीतर्फे वकील नवीन कुमार मट्टा यांनी न्यायालयाला सांगितलं की, काल म्हणजेच बुधवारी संजय सिंह यांच्या निवासस्थानाची झडती घेण्यात आली. त्यांचे जबाबही नोंदवण्यात आले. आणखी तीन जणांची चौकशी करायची आहे.
अटकेला एवढा विलंब का? : सुनावणीदरम्यान न्यायालयानं ईडीला विचारले की, तुमच्याकडं संजय सिंग यांच्याविरोधात सबळ पुरावे असताना त्यांना अटक करण्यासाठी एवढा वेळ का लागला? तसंच तुम्ही (ईडी) ज्या पैशांच्या व्यवहाराबाबत बोलत आहात, तो खूप जुन प्रकरण आहे, मग अटकेला एवढा विलंब का? असे सवाल न्यायालयानं ईडीच्या वकिलांना विचारलं. तुमच्याकडून संजय सिंगचा फोन जप्त केला असेल, तर कोठडीची गरज का आहे? त्यावर ईडीनं न्यायालयात सांगितलं की, या प्रकरणातील जबाब नुकतेच नोंदवण्यात आले आहेत.
डिजिटल पुरावे सापडले : दिनेश अरोरा यांनी सांगितलं की, त्यांनी संजय सिंह यांच्या घरासाठी 2 कोटी रुपये दिले होते. याशिवाय इंडो स्पिरिटच्या कार्यालयातून संजय सिंह यांच्या घरासाठी एक कोटी रुपयेही देण्यात आले होते. काल (4 ऑक्टोबर 2023) केलेल्या शोधात डिजिटल पुरावे सापडले आहेत. तसेच संजय सिंह यांचा फोन आम्ही जप्त केल्याचं ईडीनं म्हटलं आहे. त्यात काही संपर्क क्रमांक सापडलं आहेत, अस ईडीनं न्यायालयाला सांगितलंय.
हेही वाचा -