ETV Bharat / bharat

विरोधकांच्या मुंबई बैठकीत सहभागी होणार का? केजरीवालांनी स्पष्टच सांगितले - Aap in opposition meeting

विरोधी आघाडीची तिसरी बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. या बैठकीत आम आदमी पार्टी सहभागी होईल. खुद्द मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याची पुष्टी केली आहे. (Mumbai Opposition Meeting)

Arvind Kejriwal
अरविंद केजरीवाल
author img

By

Published : Aug 21, 2023, 7:50 PM IST

Updated : Aug 21, 2023, 7:55 PM IST

नवी दिल्ली : मुंबईत होणाऱ्या विरोधी एकता आघाडीच्या (इंडिया) तिसऱ्या बैठकीत आम आदमी पक्ष सहभागी होणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी याला दुजोरा दिला. केजरीवाल यांना 'इंडिया' बैठकीत सहभागी होण्याबाबत विचारले असता, 'मी मुंबईला जाईन आणि तेथे जी काही रणनीती बनेत, ती तेथून आल्यानंतर शेअर करेन', असे ते म्हणाले.

गेल्या आठवड्यात वाद झाला होता : गेल्या आठवड्यात दिल्लीत आप आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून वादाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर 'आप'च्या वतीने सांगण्यात आले होते की, आगामी निवडणुकीत जागावाटप होणार नसेल, तर मग विरोधी आघाडीचा अर्थ काय? यानंतर आम आदमी पक्ष विरोधी पक्ष एकता आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.

काँग्रेसकडून युती न करण्याचे संकेत होते : 16 ऑगस्ट रोजी दिल्ली काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर काँग्रेसच्या प्रवक्त्या अलका लांबा यांनी दिल्लीत लोकसभा निवडणूक युती न करता लढण्याचे संकेत दिले होते. पक्षाच्या हायकमांडकडून तशा सूचना आल्याचे सांगण्यात आले. यावरून आम आदमी पक्ष संतापला. याला उत्तर देताना, 'जेव्हा दिल्लीत युती होऊ शकत नाही, तेव्हा 'इंडिया' आघाडीला काहीच अर्थ नाही', असे 'आप'च्या प्रवक्त्या प्रियंका कक्कर म्हणाल्या होत्या.

'आप' सहभागी होणार : यानंतर 'आप' मुंबईत होणाऱ्या विरोधी पक्षाच्या बैठकीत सहभागी होणार नाही, अशी चर्चा सुरू झाली. मात्र काँग्रेसचे दिल्ली प्रभारी दीपक बाबरिया यांनी अलका लांबा यांच्या वक्तव्याला नकार देत, लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. 'विरोधी एकता दलाच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल', असे ते म्हणाले. त्यानंतर आता आम आदमी पक्ष मुंबईत होणाऱ्या बैठकीत सहभागी होण्याच्या तयारीत आहे.

  • #WATCH | "We will go to Mumbai and will let you know whatever the strategy is", says AAP Convener & Delhi CM Arvind Kejriwal on the upcoming INDIA alliance meeting pic.twitter.com/1eXVBwmdUJ

    — ANI (@ANI) August 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

३१ ऑगस्टला मुंबईत बैठक होणार : विरोधी एकता दलाची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. यापूर्वी ही बैठक पाटणा आणि बेंगळुरू येथे झाली होती. बेंगळुरूच्या बैठकीत 26 राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सहभाग नोंदवला होता. त्या बैठकीत विरोधकांच्या युतीला 'इंडिया' असे नाव देण्यात आले होते.

हेही वाचा :

  1. INDIA Mumbai Meeting : 'इंडिया'च्या मुंबई बैठकीतून केजरीवाल फारकत घेण्याची शक्यता, कॉंग्रेससोबत वाद नडणार
  2. Ramdas Athawale : 'तुम्ही कधीही आमच्यासोबत येऊ शकता', आठवलेंची नितीश कुमारांना थेट ऑफर

Last Updated : Aug 21, 2023, 7:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.