ETV Bharat / bharat

पूर्णियामध्ये 6 वर्षीय मुलाची गळा चिरुन हत्या; हत्येनंतर आरोपींनी केले 'हे' कृत्य - बधरा कोठीत मुलाची हत्या

पूर्णियामधील बधरा कोठी ( Badhra Kothi Bihar boy killed ) पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ६ वर्षाच्या चिमुकल्याचं गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. एवढेच नाही तर मारेकऱ्याने मुलाच्या प्रायव्हेट पार्टसह शरीराचे अनेक भाग कापले. गेल्या तीन दिवसांपासून मुलगा घरातून बेपत्ता होता. गौरव कुमार असे मृत मुलाचे नाव आहे.

मुलाची हत्या
मुलाची हत्या
author img

By

Published : Jul 13, 2022, 4:11 PM IST

बिहार - बिहारमधील पूर्णियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील बधरा कोठी ( Badhra Kothi Bihar boy killed ) पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ६ वर्षाच्या चिमुकल्याचं गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. एवढेच नाही तर मारेकऱ्याने मुलाच्या प्रायव्हेट पार्टसह शरीराचे अनेक भाग कापले. गेल्या तीन दिवसांपासून मुलगा घरातून बेपत्ता होता. गौरव कुमार असे मृत मुलाचे नाव आहे. काही वर्षांपूर्वी मुलाच्या आईचा भाजल्याने मृत्यू झाला होता. तर मुलाचे वडील दुसऱ्या राज्यात मजूर म्हणून काम करतात.

6 वर्षीय मुलाची गळा चिरुन हत्या

गळा चिरून मुलाची हत्या : घटनेची माहिती देताना मृत मुलाचे काका ज्ञानवर्धन यांनी सांगितले की, त्यांचा भाचा गौरव हा गेल्या ३ दिवसांपासून बेपत्ता होता. बराच शोध घेऊनही काहीही न मिळाल्याने कुटुंबीयांनी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र पोलिसांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद न करता 24 तासांनंतर गुन्हा दाखल करू, असे सांगून आम्हाला पर पाठविले.

मुलगा 9 वाजता गायब झाला. आम्ही रात्रभर त्याचा शोध घेतला. मुलगा सापडला नाही तेव्हा आम्ही पोलीस ठाण्यात गेलो. पोलिसांनी रिपोर्ट लिहिण्यास नकार दिला आणि सांगितले की तुम्ही लोक 24 तास शोधा, त्यानंतर तुम्ही रिपोर्ट दाखल करू. आम्ही विरोध केल्यावर त्यांनी पुन्हा सांगितले की आम्ही २४ तासांपूर्वी काहीही करू शकत नाही. दोन दिवस शोध घेतल्यानंतर घरामागील रिकाम्या घरात मुलाचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला होता. प्रायव्हेट पार्टही कापला होता. माझ्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली, असल्याची प्रतिक्रिया मुलाचे काका ज्ञानवर्धन कुमार यांनी सांगितले.

तीन दिवसांपासून मुलगा होता बेपत्ता : मृताच्या काकांनी सांगितले की, गावालगतच्या परिसरात माइक करून गौरव बेपत्ता झाल्याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. यादरम्यान घराच्या पाठीमागे असलेल्या ऐकलेल्या घरात एक बालक खेळायला गेला. त्यानंतर घरात मृतदेह पाहून बालक ओरडत बाहेर आला आणि आवाज करू लागला. मुलाचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता गौरव कुमारचा मृतदेह पडलेला दिसला.

मारेकऱ्याने प्रायव्हेट पार्टही कापले : गौरवचा गळा धारदार शस्त्राने कापण्यात आला. शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आढळल्या आहेत. त्याचबरोबर प्रायव्हेट पार्टही कापण्यात आली आहे. या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. गौरव त्याच्या आजोबा आणि काकांकडे राहत होता. या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलीस कुटुंबीयांची चौकशी करत आहेत.

हेही वाचा - Jammu and Kashmir : श्रीनगरच्या लाल बाजारमध्ये पोलिसांच्या पथकावर दहशतवादी हल्ला, 1 शहीद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.