हापूर (उत्तरप्रदेश): Boy Rescued From Borewell: हापूर पोलिस स्टेशन ग्रामीण हद्दीतील मोहल्ला फुलगढी येथे धक्कादायक घटना घडली. आज एक 6 वर्षीय बालक खेळत असताना बोअरवेलमध्ये पडला होता. सुमारे ४० फूट खोल बोअरवेलमध्ये बालक पडल्याने एकच खळबळ उडाली होती. बोअरवेलमधून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येत होता. गाझियाबादहून घटनास्थळी पोहोचलेली एनडीआरएफच्या पथकाने बचावकार्य करत त्या मुलाला सुखरूपपणे बाहेर काढले आहे. रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची टीमही घटनास्थळी हजर होती. Boy Rescue Operation From Borewell, Child fell into borewell
बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाचे नाव मौ आणि वडिलांचे नाव मोहसीन असल्याचे सांगण्यात आले. मुलाला ऐकू येत नव्हते. मंगळवारी खेळत असताना तो बोअरवेलमध्ये पडला. सुमारे 35 वर्षांपूर्वी पालिकेने हा बोअर खोदला होता. मात्र गेल्या 10 वर्षांपासून त्याचा वापर होत नव्हता. बोअरवेलचे तोंड उघडे होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग, पोलीस, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यासोबतच बालकाला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. त्याचबरोबर बोअरवेलच्या आत मध्ये रोषणाईसाठी टॉर्च आणि कॅमेरेही आणण्यात आले होते.
बचाव पथकाने मुलासाठी पाण्याची आणि दुधाची बाटली आणली. हापूर ग्रामीण भागातील कोटला सादत परिसरात मंगळवारी एक सहा वर्षीय बालक अचानक बोअरवेलमध्ये पडला. मुलाचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तेथे पोहोचले आणि त्यांनी याबाबतची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली. बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी प्रशासकीय कर्मचारी यांनी यावेळी मोठे प्रयत्न केले. मूल बोलत होते मात्र त्याला ऐकू येत नाही. पण बोअरवेलच्या खड्ड्यातून त्याचा रडण्याचा आवाज येत होता. सुमारे 50 फुटांवर बालक अडकल्याची बाब समोर आली. ज्या बोअरवेलमध्ये मुलगा पडला तो वरून दीड फूट रुंद होता.
एनडीआरएफचे डेप्युटी कमांडंट दीपक तलवार यांनी सांगितले की, 'हापूर जिल्ह्यात बोअरवेलमध्ये पडलेल्या 4 वर्षाच्या मुलाला NDRF च्या टीमने वाचवले आणि त्याला वाचवणं कठीण आव्हान होतं. परंतु आम्हाला अशा ऑपरेशन्सचे कौशल्याने प्रशिक्षण दिले जाते. त्याला वाचवण्यासाठी NDRF टीमचे ऑपरेशन सुमारे 4 ते 5 तास चालले. आमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान होते कारण ते मूल मूकबधिर होते. मुलाला काहीच बोलता येत नव्हते. अशा परिस्थितीत आपण बोलत राहिलो तर ते सोपे होते. कारण आपण आपला मुद्दा स्पष्ट करू शकतो. मात्र मूल मूकबधिर असल्याने आम्हाला यात अडचणीचा सामना करावा लागला. सुमारे 50 ते 55 फूट खोल खड्डा होता. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा मूल सक्रिय होऊन प्रतिसाद देत होते.आम्ही मुलाला बाहेर काढले त्यावेळी मूल पूर्ण प्रतिसाद देत होते. मुलाला बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आता बाळाच्या प्रकृतीची योग्य माहिती रुग्णालयातूनच मिळणार आहे.
यापूर्वीही अशाच घटना : यापूर्वीही अशाच घटना समोर आल्या आहेत. 28 मे रोजी बोअरवेलमध्ये अडकलेल्या तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. तेलंगणातील मेडक जिल्ह्यात ही घटना घडली होती. चिमुकल्यासाठी ऑक्सिजन पुरवण्याची व्यवस्था एनडीआरएफकडून करण्यात आली होती. मात्र या चिमुकल्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली होती. तसेच 21 फेब्रुवरी 2019 ला पुण्यातील मंचर येथे 200 फूट बोअरवेलमध्ये एक मुलगा पडला होता. तब्बल 15 तास प्रयत्न केल्यानंतर मुलाला बोअरवेलबाहेर सुखरूप काढण्यात आले होते.