ETV Bharat / bharat

Tripura MLA Oath : त्रिपुरात 11 आमदारांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ - bjp mla oath tripura

आज 11 आमदारांनी अगरताला येथील राज भवनामध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची ( Tripura MLA Oath ) शपथ घेतली. त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नऊ ( BJP MLA oath Tripura ) आणि आयपीएफटीच्या दोन आमदारांसह एकूण 11 आमदारांचा आज शपथ सोहळा ( Cabinet ministers oath Tripura ) होता. तो आज पार पडला.

cabinet ministers oath tripura
त्रिपुरा आमदार मंत्रिपद शपथ
author img

By

Published : May 16, 2022, 1:49 PM IST

अगरताला (त्रिपुरा) - आज 11 आमदारांनी अगरताला येथील राज भवनामध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची ( Tripura MLA Oath ) शपथ घेतली. त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नऊ ( BJP MLA oath Tripura ) आणि आयपीएफटीच्या दोन आमदारांसह एकूण 11 आमदारांचा आज शपथ सोहळा ( Cabinet ministers oath Tripura ) होता. तो आज पार पडला.

हेही वाचा - CM Ashok Gehlot : भाजपचा अजेंडा हिंदुत्वाचा, त्यामुळे देशात दंगली; गेहलोत यांचा भाजपावर निशाणा

या संदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, आयपीएफटीचे मेवार कुमार जमातिया वगळता, बिप्लब कुमार देब यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. देब सरकारमध्ये आदिवासी कल्याण मंत्री असलेले जमातिया आणि आयपीएफटीचे प्रमुख एनसी देब बर्मा यांच्यातील मतभेदांच्या बातम्या अलीकडेच समोर आल्या होत्या.

रविवारी रात्री राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात साहा यांनी सांगितले की, जिष्णू देव वर्मा, एनसी देब बर्मा (आयपीएफटी), रतनलाल नाथ, प्रणजित सिंग रॉय, मनोज कांती देब, संताना चकमा, राम प्रसाद पॉल, भगवान दास, सुशांत चौधरी, रामपदा जमातिया आणि प्रेम कुमार रेआंग (IPFT) उद्या राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतील.

तत्पूर्वी रविवारी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य माणिक साहा यांनी त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्यात माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्यासह भाजपचे आमदार आणि मंत्री उपस्थित होते. शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाचा अजेंडा पुढे नेत मी त्रिपुरातील लोकांसाठी काम करेन. कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीकडे मी लक्ष देईन, असे साहा म्हणाले होते. त्याचबरोबर, विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील नेतृत्व बदलाबाबत विचारले असता कोणतेही आव्हान नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

हेही वाचा - Gyanvapi Masjid Survey : ज्ञानव्यापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा, सर्वेक्षण पूर्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.