नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं कारखान्यावर टाकली धाड; धाडसत्रानंतर विवेक कोल्हेंची प्रतिक्रिया - Vivek Kolhe - VIVEK KOLHE
Published : Jun 13, 2024, 9:01 PM IST
नाशिक Vivek Kolhe : नाशिक शिक्षक मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून साखर कारखान्यावर धाडसत्र सुरु झाल्याचा आरोप, भाजपाचे युवानेते तसेच नाशिक शिक्षक मतदार संघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) केला आहे. कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच भाजपचेा विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदार संघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर सध्या या जागेवर विद्यमान आमदार किशोर दराडे हे शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी आहे. त्यातच विवेक कोल्हे यांनी देखील अपक्ष उमेदवारी दाखल करुन त्यांना शह देण्याचा प्रयत्न केलाय.
धाडसत्र सुरु : उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यावर धाडसत्र सुरु झाले आहे. एकमागे एक धाडी टाकल्या जात आहेत. महत्वाचं म्हणजे हे खात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडं असून जाणीवपूर्वक आणि राजकीय दडपशाही करण्यासाठी यंत्रणेचा वापर होत असल्याचं विवेक कोल्हे यांनी कोपरगाव येथे पत्रकार परिषद घेत सांगितलय.