जोडप्यानं साखरपुडा समारंभात एकमेकांना घातलं हेल्मेट, कारण काय? पाहा व्हिडिओ
Published : Nov 28, 2024, 12:29 PM IST
राजनांदगाव- मध्यप्रदेशमध्ये साखरपुड्याचा अनोखा कार्यक्रम पार पडला आहे. साखरपुड्याच्या कार्यक्रमात जोडप्यानं एकमेकांच्या हातात अंगठी घातली. त्यानंतर एकमेकांच्या डोक्यात हेल्मेट घातले. वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे दोघांनी वचन दिले. या विवाह समारंभातून दोघांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याकरिता ही जनजागृती केली. दोघांनी एकमेकांना हेल्मेट घातल्यानंतर उपस्थित पाहुणेमंडळी हैराण झाले. मात्र, त्यामागील कारण समजाच दोन्ही बाजुकडील पाहुणेमंडळींनी कौतुक केलं. राजनांदगाव जिल्ह्यातील जारवाहीमधील विरेंद्र साहू यांचा विवाह करियाटोलामधील ज्योति साहू यांच्याबरोबर होणार आहे. २०२२ मध्ये वीरेंद्र यांचे पिता पंचराम यांचा जानेवारी दुचाकीवरून घरी परतताना रस्ते अपघातात मृत्यू झाला. जर त्यावेळेस त्यांनी हेल्मेट घातले असते तर त्यांचे प्राण वाचू शकते, अशी कुटुंबीयांची भावना आहे. त्यामुळे ते विविध माध्यमांतून वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, अशी जनजागृती करतात.