महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

देशातील महिलांच्या विकासाला वाव देणारा अर्थसंकल्प- ज्योती दोशी - Union Budget 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 23, 2024, 1:55 PM IST

मुंबई Announcements For Womens : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (23 जुलै) देशाचा अर्थसंकल्प  सादर केला. यावेळी महिलांसाठीही अनेक घोषणा करण्यात आल्या. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाविषयी इंडियन मर्चंट ऑफ चेंबरच्या महिला विंगच्या अध्यक्ष ज्योती दोशी यांच्याशी संवाद साधण्यात आला असता त्या म्हणाल्या की, "केंद्र सरकारनं जाहीर केलेला अर्थसंकल्प हा महिलांच्या सक्षमीकरणाला बळ देणारा अर्थसंकल्प आहे. यामध्ये महिलांच्या आरोग्यासाठी तसंच त्यांच्या रोजगारासाठी नव्यानं तरतूद करण्यात आलीय. तसंच महिलांसाठी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. ही अतिशय समाधानाची बाब आहे. महिलांना त्यांच्या नावे संपत्ती खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात सूट मिळणार आहे. तसंच महिलांच्या नावे आता घर खरेदी होणार आहे. त्यामुळं महिलांना सन्मान देणारा आणि त्यांचं सक्षमीकरण करणारा हा अर्थसंकल्प आहे."

ABOUT THE AUTHOR

...view details