कोलकाता England Tour of India : भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे आणि यजमानांसोबत पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका खेळत आहे. यात भारतीय संघ 1-2 नं पिछाडीवर असून ही कसोटी मालिका 7 जानेवारीला संपणार आहे. या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ नव्या वर्षात 22 जानेवारीपासून मायदेशात इंग्लंडसोबत T20 आणि वनडे आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे.
मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर : भारतीय आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यात पाच सामन्यांची T20 मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. ही मालिका 22 जानेवारीपासून सुरु होणार आहे. या दौऱ्यात पहिले T20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडनं आपला संघही जाहीर केला आहे. यात जॉस बटलरची T20 आणि वनडे मालिकेत इंग्लंड संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही साहेबांच्या संघाचीही घोषणा करण्यात आली आहे.
Our squads for 🏏
— England Cricket (@englandcricket) December 22, 2024
India ODI series ☑
India T20 series ☑
Champions Trophy ☑
Click for more 👇
कशी असेल T20 मालिका : 2025 मध्ये इंग्लंडचा संघ सर्वात प्रथम भारत दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यात 22 जानेवारीपासून पाच सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 जानेवारीला होणार आहे. दुसरा सामना 25 जानेवारीला होणार आहे. त्याचबरोबर मालिकेतील तिसरा सामना 28 जानेवारीला होणार आहे. चौथा सामना 31 जानेवारीला होणार आहे. तर, या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना 2 फेब्रुवारीला होणार आहे.
वनडे मालिकाही होणार : T20 आंतरराष्ट्रीय मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे. दुसरा सामना 9 फेब्रुवारीला होणार आहे. तर, मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 12 फेब्रुवारीला होणार आहे. या दौऱ्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. बॉर्डर-गावस्कर मालिकेनंतर T20 आंतरराष्ट्रीय आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा केली जाणार आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड T20 मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला T20 सामना : 22 जानेवारी 2025, कोलकाता (ईडन गार्डन्स)
- दुसरा T20 सामना : 25 जानेवारी 2025, चेन्नई (एमए चिदंबरम स्टेडियम)
- तिसरा T20 सामना : 28 जानेवारी 2025, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
- चौथा T20 सामना : 31 जानेवारी 2025, पुणे (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
- पाचवा T20 सामना : 02 फेब्रुवारी 2025, मुंबई (वानखेडे स्टेडियम)
Breaking squad news! 🚨
— England Cricket (@englandcricket) December 22, 2024
Our squads to tour India and for the Champions Trophy! 📝
Click below for the details 👇
भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला वनडे सामना : 06 फेब्रुवारी 2025, नागपूर (विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
- दुसरा वनडे सामना : 09 फेब्रुवारी 2025, कटक (बाराबती स्टेडियम)
- तिसरा वनडे सामना : 12 फेब्रुवारी 2025, अहमदाबाद (नरेंद्र मोदी स्टेडियम)
इंग्लंड वनडे संघ : जॉस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडेन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क लाकूड.
इंग्लंड T20 संघ : जॉस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वुड.
हेही वाचा :