बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होणार? नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? पाहा व्हिडिओ - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
Published : Nov 18, 2024, 2:07 PM IST
शिर्डी : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी (17 नोव्हेंबर) संगमनेर तालुक्यातील साकुर येथे महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला हजेरी लावली. यावेळी बोलत असताना सुळे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलंय. त्या म्हणाल्या, "बाळासाहेब थोरात यांचं नेतृत्व उभ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. जे स्वप्न तुमच्या मनात आहे, ते पूर्ण व्हावं, अशी माझी देखील इच्छा आहे. महाराष्ट्राला एक सुसंस्कृत नेतृत्वाची खरंच गरज आहे." सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यानंतर बाळासाहेब थोरात भावी मुख्यमंत्री होणार का? या आशयाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय. तर पुढं बोलत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मी आताच बाळासाहेबांच्या कानात सांगितलंय की 2029 ला तुम्हाला तिकीट मिळणार नाही. आम्ही इथून जयश्रीला तिकीट देऊ." सुळेंनी असं म्हणताच कार्यकर्त्यांमधून 'दिल्ली दिल्ली' असा आवाज आला. त्यावर "तिला दिल्लीला घेवून जाते. मला पण सोबत होईल", असं सुळे म्हणाले. यावरुन सुप्रिया सुळे यांनी जयश्री थोरातांच्या खासदारकीचे संकेत दिले आहेत.