चेन्नई ते तिरुनेलवेली वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, डब्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान - वंदे भारत ट्रेन
Published : Feb 5, 2024, 6:48 PM IST
तिरुनेलवेली (तामिळनाडू) Stone Pelting On Vande Bharat Train : चेन्नई ते तिरुनेलवेली दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनवर काल (4 फेब्रुवारी) काही अज्ञात लोकांनी दगडफेक केली. (Vande Bharat Train) ट्रेन थुथुकुडी जिल्ह्यातील मनियाची रेल्वे स्टेशनवरून जात असताना ही घटना घडली. दगडफेकीत वंदे भारतच्या काही डब्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नऊ काचा फुटल्या. त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई केली. वंदे भारत ट्रेन सुरक्षितपणे नेल्ली जंक्शन रेल्वे स्थानकावर आणण्यात आली. (Vande Bharat Train Damage) जिथे राखीव लाइन पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलानं तोडफोडीच्या कृत्याचा सखोल तपास सुरू केला. यानंतर अधिकाऱ्यांनी तत्परतेनं फुटलेल्या काचा बदलण्याची व्यवस्था केली.
घटनेचा तपास सुरू: तिरुनेलवेली जंक्शन रेल्वे स्थानक व्यवस्थापक बाबा राजीवकुमार यांनी ईटीव्हीला दिलेल्या निवेदनात पुष्टी केली की, ट्रेनची तात्पुरती दुरुस्ती केली असून संपूर्ण दुरुस्ती सुटीच्या दिवशी केली जाईल. वंदे भारत ट्रेनचे नुकसान करण्याच्या हेतुपुरस्सर कृत्यासाठी जबाबदार असलेल्यांची ओळख पटवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.