महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

साप झाला 'जानी दुश्मन!' 34 दिवसांत सहा वेळा केला दंश; नवव्यांदा होईल मृत्यू? - Snake Deadly Enemy - SNAKE DEADLY ENEMY

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 12, 2024, 11:41 AM IST

फतेहपूर Snake Bite News : उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातून एका तरुणाला दीड महिन्यात सहा वेळा साप चावल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. यामुळं तरुणावर उपचार करणारे डॉक्टरदेखील आश्चर्यचकित झालेत. तर आता या तरुणानं दावा केलाय की, " त्याला एक स्वप्न पडलं. नवव्यांदा तुला कोणीही वाचवू शकणार नाही, असं सापानं स्वप्नात सांगितल्याचं तरुण म्हणाला. विकास द्विवेदी असं तरुणाचं नाव आहे.  तो जिल्ह्यातील मालवण पोलीस स्टेशन हद्दीतील सौरा गावातील रहिवासी आहे. विकासचा दावा आहे की, प्रत्येकवेळी साप हा शनिवार किंवा रविवार चावला. सापाच्या भीतीनं तो  मावशीच्या आणि नंतर काकांच्या घरी गेला.  मात्र तिथंही या सापानं त्याचा पिच्छा सोडला नसल्याचंही त्यानं सांगितलं. या प्रकरणामुळं गावात चिंताजनक वातावरण निर्माण झालंय. 

Disclaimer- ईटीव्ही भारत कोणत्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. 

ABOUT THE AUTHOR

...view details