महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

श्रीमंत 'दगडूशेठ'च्या गणेशोत्सव सजावटीचा वासापूजनाने श्रीगणेशा... - Dagdusheth Ganpati Pune - DAGDUSHETH GANPATI PUNE

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 26, 2024, 8:09 PM IST

पुणे Dagdusheth Ganpati Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीनं ट्रस्टच्या १३२ व्या वर्षानिमित्त यावर्षी गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशमधील 'श्री जटोली शिवमंदिर' साकारण्यात येणार आहे. यंदाच्या सजावटीचे वासापूजन (Vasa Puja) आज जय गणेश प्रांगण या सजावट स्थळी करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री जटोली शिवमंदिराची साकारणार प्रतिकृती : यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले की, उत्तुंग हिमालयाच्या सानिध्यात प्रतिष्ठित आणि अत्यंत पवित्र असलेल्या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात ट्रस्टतर्फे साकारण्यात येणार आहे. गणेशोत्सवात साकारण्यात येणाऱ्या जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १२५ फूट लांब, ५० फूट रंद आणि १०० फूट उंच असणार आहे. मंदिराची प्रतिकृती ही पूर्णपणे फायबरमध्ये उभारण्यात येणार आहे. त्यावर रंगकाम देखील करण्यात येणार आहे. भाविकांना लांबून सहजतेने गणपतीचं दर्शन घेता येणार आहे. कलादिग्दर्शक अमन विधाते यांनी मंदिराचे काम, विद्युत रोषणाईचं काम वाईकर बंधू आणि मंडप व्यवस्था काळे मांडववाले करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details