मराठा आंदोलक मनोज जरांगे अन् मंगेश चिवटे यांच्यात बंद दाराआड खलबतं - मराठा आंदोलक मनोज जरांगे
Published : Feb 3, 2024, 3:53 PM IST
जालना : Manoj Jarange and Mangesh Chivate Meet : मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कर्तव्य अधिकारी (ओएसडी) मंगेश चिवटे यांच्यात आज शनिवार 3 फेब्रुवारी दुपारी बंद दाराआड चर्चा झाली. त्यांच्यामध्ये नेमकी काय खलबतं झाली हे समोर आलं नाही. अंतरवली सराटीत सुमारे चार तास जरांगे आणि चिवटे यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. याबाबत विचारले असता ही सदिच्छा भेट होती असं जरांगे पाटील यांनी सांगितलं. 57 लाख कुणबी नोंदी असलेल्या लोकांच्या परिवाराला प्रमापत्र वाटप करा. तसंच, मराठवाड्यातील कमी नोंदीबाबत चिवटे यांच्याशी चर्चा केल्याचं जरांगे यांनी सांगितलं आहे. तर, चिवटे यांना या भेटीबाबत विचारलं असता ते म्हणाले, आपण तुळजाभवानीचा प्रसाद आणि अक्कलकोट स्वामी समर्थाचा प्रसाद घेऊन आलो होतो. ही एक सदिच्छा भेट होती असंही ते म्हणाले.