महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान, पाहा व्हिडिओ - Sant Tukaram Maharaj Palkhi

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 28, 2024, 6:09 PM IST

पुणे Sant Tukaram Maharaj Palkhi : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं पंढरपूरकडं प्रस्थान केलं आहे. यावेळी ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात अवघा मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालताच पालखीचा इनामदार वाड्यात पहिला मुक्काम असेल. तिथं रात्री आरती, मग कीर्तन होईल. या सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येनं वारकरी देहूत दाखल झाले आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाजारांचा 339 वा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात पार पडला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देहूत दाखल झाले होते. ज्ञानोबा तुकाराम आणि ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजरानं अवघी देहू नगरी दुमदुमून गेली होती. कालपासून देहूत गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. इंद्रायणीकाठी वैष्णवांचा मेळा भरला होता. सकाळी इनामदार वाड्यात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. तिथून टाळ मृदंगच्या गजरात मुख्य मंदिरात पादुका आणण्यात आल्या. काही वेळातच अश्व आणि दिंड्याचं देऊळ वाड्यात आगमन झालं. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर ठीक पावणे तीनच्या सुमारास तुकोबांच्या पालखीनं ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान केलं. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. 

ABOUT THE AUTHOR

...view details