महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

संत गजानन महाराजांची पालखी पंढरपुरातून शेगावात परतली, दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी - Sant Gajanan Maharaj Palanquin - SANT GAJANAN MAHARAJ PALANQUIN

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 11, 2024, 5:17 PM IST

बुलढाणा Sant Gajanan Maharaj Palanquin : शेगावच्या संत श्री गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशीचा सोहळा आटोपून आज (11 ऑगस्ट) स्वगृही म्हणजेच शेगावला परतली आहे. खामगाव ते शेगांव या 18 किमी रस्त्यावर पालखी सोबत चालणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. लाखो भाविक आज पालखी सोबत पायी चालत आहेत. 13 जून रोजी श्रींची पालखी आषाढी वारीसाठी संतनगरीतून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली होती. 60 दिवसांचा पायदळी प्रवास आणि 700 किलोमीटरचे अंतर श्रींच्या भक्तीत तल्लीन होऊन पार करत 15 जुलै रोजी पालखी विठुरायाच्या पंढरीत पोहोचली होती.

श्रींच्या पालखीला 55 वर्षांची परंपरा : 17 जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा आटपून पाच दिवसांचा मुक्काम पंढरीत केल्यानंतर 21 जुलैपासून पालखी परतीच्या मार्गाला होती. तर आज 11 ऑगस्ट रोजी श्रींची पालखी आज संतनगरीत शेगावला परतली आहे. श्रींच्या पालखीचे दर्शन आणि स्वागत करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाले होते. भाविकांच्या चेहऱ्यावरसुद्धा मोठा उत्साह यानिमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहे. लहानापासून तर मोठ्या व्यक्ती, महिला, पुरुष या पालखी सोबत दरवर्षी पायी चालत असतात. ठिकठिकाणी पायी चालणाऱ्या भाविकांसाठी फराळ, पाणी आणि न्याहारीचीसुद्धा व्यवस्था केली आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details