साडेतीन टन केशर आंबे साईचरणी अर्पण; साईबाबा भाविकांना आमरसाची मेजवानी - Sai Baba Prasadalaya - SAI BABA PRASADALAYA
Published : Jun 6, 2024, 1:30 PM IST
शिर्डी (अहमदनगर) Sai Baba Prasadalaya : शिर्डीच्या साईबाबांना (Sai Baba) दान म्हणून साईभक्त शेतमालापासून ते हिरे, माणिक, मोती अर्पण करतात. साई भक्तांच्या दानातून साई प्रसादालयात मोफत भोजन अर्थात साईंचा प्रसाद दिला जातो. सध्या आंब्याचा हंगाम सुरू आहे, म्हणून भाविकांना साईबाबा प्रसादालयात आज जेवणात आमरस दिला जात आहे. शिरूर येथील भाविक दीपक नारायण सरगळ यांच्या देणगीतून भाविक आमरसाचा स्वाद घेणार आहेत.
साईचरणी साडेतीन टन केशर आंबे अर्पण : शिर्डीत प्रत्येक भक्त साई दर्शनासाठी आल्यानंतर आपल्या कुवतीप्रमाणं दान करत असतो. सुगीच्या हंगामात शेतकरी आपल्या शेतीत निघालेल्या धान्यापैकी काही धान्य दान करत असतो. या व्यतिरिक्त साईभक्त पैसे, सोने, चांदी, हिरे, मोतीही दान करतात. असेच शिरुर येथील साईभक्त दीपक सरगळ हे आंबा बागायतदार शेतकरी असून त्यांनी साईचरणी साडेतीन टन केशर आंबे अर्पण केले आहेत. साईभक्त दीपक हे 2019 पासून आपल्या बागेतील आंबे साई चरणी दान करतात.