अयोध्येला निमंत्रण असूनही प्रख्यात शिल्पकार प्रमोद कांबळेंनी पुण्यात साकारली प्रभू रामाची मूर्ती - अयोध्या नगरीत पंतप्रधान नरेंद्र
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 22, 2024, 2:15 PM IST
|Updated : Jan 22, 2024, 2:48 PM IST
पुणे Pramod Kamble : आज अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे. सर्वत्र दिवाळी साजरी केली जात आहे. पुण्यात देखील ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यात ठिकठिकाणी विविध मंडळांच्या वतीनं विविध कार्यक्रम होत आहेत. अयोध्या नगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा झाला. श्रीरामाच्या भाविकांकडून विविध कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या संकल्पनेतून पुणे शहरात प्रख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे हे प्रभू श्री रामाची मूर्ती साकारत आहेत. कांबळे यांना अयोध्येतील कार्यक्रमाचं निमंत्रण असतानाही ते पुण्यात थांबून प्रभू रामाची मूर्ती साकारत आहेत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी.