महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

पुण्यातील पब संस्कृती कायमची संपवा; रवींद्र धंगेकर यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडं मागणी - Pune Hit And Run Case - PUNE HIT AND RUN CASE

By ETV Bharat Marathi Team

Published : May 22, 2024, 4:03 PM IST

पुणे Pune Hit And Run Case : रविवारी मध्यरात्री पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणानंतर पुण्यातील पब संस्कृतीबाबत अनेक प्रश्न (Pub Culture) उपस्थित केले जात आहेत. पुण्यात वाढत चाललेली पब संस्कृती कायमची संपली पाहिजे,अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडं केलीय. तर पुण्यातील अनेक पबमध्ये पोलिसांचीच भागिदारी आहे. अनेक पोलीस खात्यातील पोलीस कर्मचारी हे नाचताना पाहायला मिळत असल्याचा गंभीर आरोप, यावेळी रवींद्र धंगेकर यांनी केलाय.
पब संस्कृती संपली पाहिजे : पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. वेगवेगळ्या भागातून मुले येथे शिक्षणासाठी येतात. अशा पुण्यात पब संस्कृतीचं वेड वाढत आहे. वडगाव शेरी, खराडी, कोरेगाव पार्क यासह शहराच्या वेगवेगळ्या भागात बेकायदेशीरपणे पब वाढत आहे. मध्यरात्री उशिरापर्यंत हे पब सुरू राहतात. या भागातील नागरिकांनी अनेकदा यापूर्वी कारवाई व्हावी, अशी मागणी केली होती. तरीही हे बेकायदेशीरपणे पब थाटामाटात सुरू आहेत. त्यामुळं शहरातील पब संस्कृती संपली पाहिजे, अशी मागणी आम्ही करत असल्याचं धंगेकर यांनी सांगितलंय.

ABOUT THE AUTHOR

...view details