पुण्यातून उमेदवारी जाहीर होताच रवींद्र धंगेकर यांची 'ईटीव्ही भारत'ला पहिली प्रतिक्रिया; पाहा व्हिडिओ - Ravindra Dhangekar - RAVINDRA DHANGEKAR
Published : Mar 21, 2024, 10:59 PM IST
पुणे Ravindra Dhangekar : लोकसभेसाठी (Lok Sabha elections 2024) राज्यातील महाविकास आघाडीचं जागावाटप अजून जाहीर झालं नाही. जागावाटपाचा अंतिम निर्णय होण्यापूर्वीच काँग्रेसनं गुरुवारी रात्री राज्यातील सात उमेदवारांची घोषणा केलीय. काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीय. यामध्ये पुण्यातून काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी पक्षासाठी आणि पुण्यातील जनतेसाठी काम करणार असल्याचं ई टिव्ही भारतशी बोलताना सांगितलं.
रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ लढत : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून महाराष्ट्रामधील पहिली यादी जाहीर करण्यात आलीय. राज्यातील सात जागांवर उमेदवार घोषित करण्यात आलेत. विशेष म्हणजे कोल्हापूरहून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झालीय. तसेच पुण्यामधून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. त्यामुळं आता पुण्यामध्ये काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपाचे मुरलीधर मोहोळ अशी लढत होणार आहे. तर वसंत मोरे हे पुण्यातून अपक्ष उभे राहणार आहेत.