महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीतील एक्सेल कंपनीतून वायू गळती; अनेकांचा दम घुसमटला, कंपनी समोर ग्रामस्थांचा घेराव - Excel Industries Gas leak - EXCEL INDUSTRIES GAS LEAK

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 24, 2024, 10:00 AM IST

रत्नागिरी Excel Industries Company Gas leak : खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी पुन्हा एकदा हादरली आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा एमआयडीसीमध्ये गॅस गळतीची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या दरम्यान एक्सेल कंपनीमध्ये वायू गळती झाली. यात 7 जणांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं नजीकच्या लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लोटे परिसरात राहणाऱ्या 40 ग्रामस्थांना वायू बाधा झाली. महिनाभरातली ही दुसरी घटना असल्यामुळं चाळकेवाडी येथील संतप्त ग्रामस्थांनी कंपनीच्या गेटवर ठिय्या मांडला होता. कंपनी प्रशासनाकडून यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांची समजूत काढण्याचं काम सुरू होतं. पोलिसही तातडीनं घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, या घटनेमुळं लोटे एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details