एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते झाले भावनिक, शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार; कार्यकर्त्यांना आत्मविश्वास
Published : Nov 27, 2024, 10:44 PM IST
|Updated : Nov 27, 2024, 10:52 PM IST
ठाणे : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी नेत्यांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. यावर आता राम रेपाळे यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, "सर्वसामान्य कार्यकर्ता ते शाखाप्रमुख, शाखाप्रमुख ते नगरसेवक, नगरसेवक ते विभाग प्रमुख, सभागृह नेते, आमदार जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्क नेते असा प्रवास करत मंत्री, विरोधी पक्षनेते, पुन्हा मंत्री आणि आता मुख्यमंत्री असा प्रवास केलेले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक असलेले राम रेपाळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर त्यांच्याशी सहमत असून ते घेतील ती भूमिका मान्य असल्याचं त्यांनी सांगितलं". एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 वर्षे काम करताना त्यांच्या आयुष्यातील सर्व चांगल्या वाईट वेळी त्यांच्यासोबत राहून आम्ही कणखर झालो आहोत, असा नेता आम्ही पाहिलेला नाही. एकनाथ शिंदे यांनी काही विधानसभेच्या जागांची जबाबदारी देखील राम रेपाळे यांच्यावर दिली होती. त्यांनी ती चोखपणे पार पाडत त्या जागा ही जिंकून आणल्या आहेत. त्यानंतर आताची त्यांची भूमिका पाहिल्यावरही ते पुन्हा मुख्यमंत्री होतील असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये आहे.