महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

वडाळ्यातील राम मंदिर भाविकांनी दुमदुमलं, अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 22, 2024, 10:04 PM IST

मुंबई Ram Mandir Pran Pratishtha : 1965 साली स्थापन झालेल्या वडाळ्यातील प्रसिद्ध अशा राम मंदिरात गेल्या तीन दिवसांपासून आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. (Ram Mandir in Wadala) आज अयोध्यापती प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली असून 500 वर्षांपासून असलेली प्रतीक्षा आज अखेर संपली आहे. (Ram Mandir Inauguration) समस्त हिंदू बांधवांनी आजचा दिवस दिवाळी सारखा साजरा केला आहे. मुंबईतील प्रसिद्ध अशा वडाळ्यातील राम मंदिरात देखील भाविकांची सकाळपासून रीघ लागली आहे. (Ram Darshan)

नऊ नद्यांच्या पाण्यानं राममूर्तीला अभिषेक : नऊ नद्यांमधून आणलेल्या जलापासून वडाळ्यातील राम मंदिरात वसलेल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला असल्याची माहिती या मंदिराचे मुख्य समन्वयक जी एस भट यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे. (Ayodhya Ram Mandir) आज विशेष अशा दिवशी वडाळ्यातील राम मंदिरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं कशाप्रकारे आयोजन करण्यात आलं आहे याबाबत माहिती देत आहेत वडाळा राम मंदिराचे मुख्य समन्वयक जीएस भट

ABOUT THE AUTHOR

...view details