'लाडकी बहीण योजने'वरुन राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले, "ही योजना बंद..." - Ladki Bahin Yojana - LADKI BAHIN YOJANA
Published : Sep 30, 2024, 7:56 AM IST
नांदेड Pravin Darekar on Raj Thackeray : नांदेड लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात रविवारी (29 सप्टेंबर) भाजपाचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे चिखलीकर यांच्या आयोजनातून 'लाडकी बहीण स्नेह मेळावा' कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनीदेखील हजेरी लावली. कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना दरेकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'लाडकी बहीण योजने'वरुन सरकारवर केलेल्या टीकेला उत्तर दिलं. शनिवारी अमरावतीत पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर अप्रत्यक्षरित्या टीका केली होती. "जानेवारीत पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाहीत",असं ते म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देत दरेकर म्हणाले की, "लाडकी बहीण योजना ही शासनाची महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेसाठी वर्षभरात 36, 000 कोटी रुपये लागणार आहेत. त्यातील 25 हजार कोटी रुपयांची तरतूद शासनानं पूर्वीच करून ठेवलीय. त्यामुळं ही योजना बंद होणार नाही."