महाविकास आघाडीनं आम्हाला 20 जागा द्याव्या, 'या' पक्षाची मागणी - ASSEMBLY ELECTION 2024
Published : Oct 16, 2024, 10:15 PM IST
पुणे : प्रागतिक पक्षांची आज पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, आम्ही दोन ते तीन वर्षापासून महाविकास आघाडीमध्ये काम करत आहोत. महाविकास आघाडी स्थापन करण्यासाठी देखील आम्ही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लोकसभेत देखील आम्ही इंडिया आघाडीसोबत राहिलो असून ज्या 31 जागा निवडून आल्या आहेत. त्यात आमच्या प्रागतिक पक्षाची देखील ताकद मोठी होती. म्हणून आम्ही विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडं 20 जागांची मागणी केली आहे. आमची जिथं जिथं ताकद आहे, त्याच मतदार संघात आम्ही उमेदवारी मागितली आहे. या विधानसभा निवडणुकीत आम्ही नवीन उमेदवार देणार असल्याचं देखील यावेळी पाटील म्हणाले. तर या बैठकीला शेकापचे नेते जयंत पाटील, कम्युनिस्ट पक्षाचे अशोक ढवळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट आडम मास्तर, सत्यशोधक पक्षाचे किशोर ढमाले आदी मान्यवर उपस्थित होते.