महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

अर्थसंकल्पात एकच दोष..."महाराष्ट्र रोष, महाराष्ट्र रोष..' घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन.... - NCP SP Protest - NCP SP PROTEST

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 29, 2024, 4:38 PM IST

पुणे NCP SP Protest Against Government : पुणे : नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारच्या वतीनं महाराष्ट्राला सापत्न वागणूक देण्यात आली आहे. संपूर्ण अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा एकदाही उल्लेख नसलेला इतिहासातील हा कदाचित पहिलाच अर्थसंकल्प असेल, असा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा आरोप आहे. 'अर्थसंकल्पात एकच दोष...महाराष्ट्र रोष, महाराष्ट्र रोष' असे नारे देत आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. "मागच्या आठवड्यात केंद्र सरकारकडून जो अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्राला काहीच नवीन देण्यात आलेल नाही. मोदी सरकारच्या वतीनं महाराष्ट्राला सावत्र वागणूक देण्यात आली आहे. अनेक राज्यांना भरभरून निधी तर महाराष्ट्राला भोपळा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जनता स्वाभिमानी असून महाराष्ट्रावर झालेला हा अन्याय सहन करणार नाही. महाराष्ट्राला मिळालेल्या या अपमानास्पद वागणुकीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येत आहे." असा दावा पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details