ठाण्याला पावसानं झोडपलं; ठाणे-मुलुंड दरम्यान सिंग्नल यंत्रणा ठप्प; मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली - Weather Update - WEATHER UPDATE
Published : May 13, 2024, 10:04 PM IST
ठाणे Weather Update : सोमवारी दुपारी ३-३० यानंतर अचानक सोसायट्याचा वारा आणि मुसळधार पाऊसानं (Thane Rain) ठाणेकरांना झोडपून काढलं. संध्याकाळी मुसळधार पावसाच्या तडाख्यात मध्य रेल्वेची वाहतूक सेवा ठप्प झाली. ठाणे-मुलुंड दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं आणि सिग्नल पॅनेलमध्ये बिघाड झाल्यानं रेल्वे वाहतूकीवर विपरीत परिणाम झाला. कल्याणकडं जाणाऱ्या रेल्वे लोकल रद्द (Mumbai Local) करण्यात आल्या. यामुळं कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे परिसरातील चाकरमान्यांची गैरसोय झाली. यामुळं मुंबईच्या दिशेने जाणार्या स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. अखेर रेल्वे प्रशासनाच्या कर्मचार्यांनी तब्बल १ तासानंतर रेल्वे सुरु केली. मात्र, त्यानंतर लोकल एक तास उशिरा धावत होत्या. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रेल्वे सेवेत बिघाड झाल्यानं प्रवाश्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.