महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

इलेक्ट्रिक दुचाकीच्या शॉर्टसर्किटमुळं लागली आग, सुमारे 18 दुचाकी जळून खाक - electric Motorcycle

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 16, 2024, 10:09 PM IST

मुंबई : बोरिवली पश्चिम मोक्ष प्लाझा मॉलसमोरील मंगलकुंज इमारतीच्या पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक दुचाकीच्या शॉर्टसर्किटमुळे संपूर्ण पार्किंगमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत 18 पेक्षा अधिक दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. मात्र, अचानक लागलेल्या आगीमुळे घटनास्थळाजवळील परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होत. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुपारी 4 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. आग इतकी भीषण होती की, ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सात गाड्या लागल्या. दुपारी चार वाजता आग पूर्णपणे आटोक्यात आली, असं अधिकारी म्हणाले. यावेळी जवळपास 18 दुचाकी जळाल्याचं समोर आलं.

ABOUT THE AUTHOR

...view details