नूडलच्या पाकिटातून हिऱ्यांची तस्करी ; चार प्रवाशांना कस्टम विभागानं ठोकल्या बेड्या - Customs Seized Gold In Mumbai - CUSTOMS SEIZED GOLD IN MUMBAI
Published : Apr 23, 2024, 9:36 AM IST
मुंबई Customs Seized Gold In Mumbai : मुंबई कस्टम विभागानं तब्बल 6 कोटी 46 लाख रुपयांचं सोनं आणि हिऱ्याचे दागिने मुंबई विमानतळावरुन जप्त केले आहेत. कस्टम विभागानं 19 ते 21 एप्रिलदरम्यान ही कारवाई केली आहे. या कारवाईत मुंबई कस्टम विभागानं 4.44 कोटी रुपयांचे 6.815 किलो सोनं आणि 2 कोटी 02 लाख रुपये किंमतीचे हिरे असा एकूण 6 कोटी 46 लाखांचा मुद्देमाल मुंबई पोलिसांनी जप्त केला आहे. कस्टम विभागानं 13 कारवाया करत हा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती कस्टम विभागानं वृत्तसंस्थेला दिली आहे. नूडलच्या पाकिटात हिरे लपवून ठेवून आणल्याप्रकरणी चार तस्करांना कस्टम विभागानं अटक केली आहे. या प्रकरणी कस्टम विभागानं पुढील तपास सुरू केला आहे.