महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

गोड बोलून काटा काढण्याचा सरकारचा डाव- मनोज जरांगे पाटील - Manoj Jarange Patil - MANOJ JARANGE PATIL

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 11, 2024, 2:33 PM IST

जालना Manoj Jarange Hunger Strike : माझं कठोर आमरण उपोषण सुरू आहे. एका बाजूला मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी बैठका घेऊ अशी चर्चा सरकारकडून सुरू आहे. मात्र, अशा चर्चा करून सरकारकडून गोड बोलून माझा काटा काढण्याचा डाव आहे, असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. जरांगे यांनी आज (11 जून) अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. सरकारकून माझ्या आंदोलनाची दखल घेतली जात नसून केवळ मला खेळवणं सुरू आहे. जर या आंदोलनाची दखल सरकारनं घेतली नाही. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून डाॅक्टरांच्या सल्ल्यानंतरही त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचाही जरांगे यांनी समाचार घेतलाय.

ABOUT THE AUTHOR

...view details