अशोक चव्हाणांच्या मुलीनं विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं? नेमकं काय म्हणाल्या अमिता चव्हाण? पाहा व्हिडिओ - अमिता चव्हाण
Published : Feb 17, 2024, 9:47 PM IST
नांदेड Sreejaya Chavan News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश करताच त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलंय. त्यामुळं आता भोकर विधानसभेची जागा रिकामी झालीय. याच पार्श्वभूमीवर भोकरमधून अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण लढणार का? असा प्रश्न उपस्थित केल्या जातोय. यावरच आता अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधत असताना अमिता चव्हाण म्हणाल्या की, "भोकरच्या लोकांची आणि श्रीजयाची इच्छा असेल तर तिला भोकर मतदार संघासाठी तयार करू." तसंच लोकांची मतं जाणून घेऊन श्रीजयाबाबत निर्णय घेऊ लोकांवर उमेदवार लादणार नाही, असंही त्या म्हणाल्या. पुढं अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाबाबत विचारण्यात आलं असता त्या म्हणाल्या की, "भाजपा प्रवेशाबाबत आमच्या कुटुंबात चर्चा झाली होती. कोणताही निर्णय घेताना आमच्या कुटुंबात चर्चा होते. त्यानंतर योग्य तो निर्णय साहेब घेतात." तर श्रीजया चव्हाण या अशोक चव्हाण यांच्या राजकीय वारस आहेत. त्यामुळं भोकर विधानसभेतून त्याच भाजपाच्या उमेदवार राहणार असल्याचं निश्चित मानलं जातय.