महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

सचिन तेंडुलकरने सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क; नागरिकांनाही केलं आवाहन - ASSEMBLY ELECTION VOTING

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2024, 11:18 AM IST

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) आज (20 नोव्हेंबर) मतदान होतंय. 288 मतदारसंघांसाठी हे मतदान होत असून सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. यावेळी भारतीय निवडणूक आयोगाचे ब्रँड ॲम्बेसेडर, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar Casts His Vote) पत्नी अंजली आणि मुलगी सारा यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. वांद्रे पश्चिममधील सेंट जोसेफ रोड येथील पाली चिंबई मुंबई पब्लिक स्कूल शाळेतील मतदान केंद्रात त्यांनी मतदान केलं. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सचिन तेंडुलकर म्हणाला, "मतदारांनी घराबाहेर निघून मतदान करावं. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी चांगल्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. मतदान करणं ही आपली जबाबदारी असून सर्वांनी मतदान करण्याचे कर्तव्य पार पाडावं."

ABOUT THE AUTHOR

...view details