"आपल्या पदरात काय पडतं हे...", नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? पाहा व्हिडिओ
Published : 4 hours ago
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (20 नोव्हेंबर) आपल्या कुटुंबासह दादर येथील बालमोहन विद्यामंदिर शाळेत मतदान केलं. यावर्षी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं राज ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक विशेष असल्याचं म्हटलं जातय. मतदान केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना राज ठाकरे म्हणाले, "सर्वांनीच मतदान केलं पाहिजे. मतदान नाही केलं तर आपल्या पदरात काय पडतं हे मागच्या पाच वर्षात लोकांनी पाहिलय. त्यामुळं मतदानाचा हक्क आपण सर्वांनी बजावलाच पाहिजे," असं ते म्हणाले. दरम्यान, मुंबईत आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. तर राज्यातील महत्त्वाच्या लढतींपैकी एक असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.