महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

गोदाघाटावर साकारली ५६२५ चौरस फुटांची "भरडधान्याची" महारांगोळी... - Maha Rangoli

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 7, 2024, 11:00 PM IST

नाशिक Maha Rangoli : राष्ट्रीय विकास मंडळ, गुणगौरव न्यास आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं मराठी नववर्ष निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रहितासाठी मतदान करा असा संदेश देण्यासाठी नाशिकच्या गोदावरी तीरावर ५६२५ चौरस फुटांची महारांगोळी (Maha Rangoli) साकारण्यात आलीय. या महारांगोळीसाठी तब्बल १२०० किलो नाचणी, ३०० किलो वरई, ४०० किलो बाजरी, १०० किलो मुग, ५० किलो कोदरा, ४०० किलो ज्वारी, २०० किलो राळा, १०० किलो उडीद आणि २०० किलो मसूर अशा एकूण ३००० किलो इतक्या भरडधान्यचा वापर करण्यात आला. १०० महिलांनी अवघ्या चार तासांत हि महारांगोळी साकारली. 

"राष्ट्रहितासाठी मतदान करा" : भारत सरकारनं संयुक्त राष्ट्रसंघासह २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य (मिलेट) वर्ष म्हणून घोषित केलं होतं, म्हणूनच त्या निमित्तानं मिलेट्स, श्रीअन्न, तृणधान्य यांचे आपल्या आहारातील महत्व वाढावं या हेतूनं ही भव्य रांगोळी साकारण्यात आलीय. रांगोळीतून "राष्ट्रहितासाठी मतदान करा" हा संदेश देण्यात आलाय. दोन दिवस महारांगोळी नाशिककरांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलीय.

ABOUT THE AUTHOR

...view details