ETV Bharat / bharat

तुमचे मतदार ओळखपत्र कोण तपासू शकते, पोलीस बुरखा काढून चेकिंग करू शकतात का? नियम जाणून घ्या - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

मतदाराचे ओळखपत्र कोण तपासणार? असा प्रश्न उपस्थित होतो. पोलीस महिलांचा बुरखा काढू शकतात का? याबाबत निवडणूक आयोगाचा नियम काय म्हणतो? हे जाणून घेणार आहोत.

Can you vote while wearing a burqa
बुरखा घालून मतदान करता येते का? (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2024, 1:27 PM IST

नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्याबरोबरच उत्तर प्रदेश राज्यातील विधानसभेच्या 9 जागांवरच्या पोटनिवडणुकीसाठी आज म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. परंतु मतदानापूर्वीच उत्तर प्रदेश राज्यात बुरखा, हिजाब, नकाब घालण्यावरून गदारोळ झालाय. अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आणि भाजपा आमनेसामने आलेत. एकीकडे समाजवादी पक्षाने मुस्लिम महिलांचा बुरखा काढून तपासणी करू नये, अशी मागणी केलीय, तर दुसरीकडे भाजपाचे गिरीराज सिंह म्हणाले की, मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदाराची ओळख पटली पाहिजे. आता हे प्रकरण निवडणूक आयोगाच्या कोर्टात पोहोचलंय. अखिलेश यादवांच्या समाजवादी पक्षानं निवडणूक आयोगाचं दार ठोठावलंय. समाजवादी पक्षाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून मुस्लिम महिलांची बुरखा काढून तपासणी करू नये, अशी मागणी केलीय. मुस्लिम महिला बुरखा घालून मतदानाला गेल्या तर पोलिसांनी त्यांचा बुरखा काढून त्यांना तपासू नये, असं सपाने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटलंय. मतदानादरम्यान मतदारांचे ओळखपत्र तपासण्याचा अधिकार पोलिसांना नसावा, असे समाजवादी पक्षाचे म्हणणं आहे. अशा परिस्थितीत मतदाराचे ओळखपत्र कोण तपासणार? असा प्रश्न उपस्थित होतो. पोलीस महिलांचा बुरखा काढू शकतात का? याबाबत निवडणूक आयोगाचा नियम काय म्हणतो? हे जाणून घेणार आहोत.

निवडणूक आयोगाचा नियम काय? : निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, मतदान करण्यापूर्वी प्रत्येक मतदाराची पडताळणी करणे आवश्यक आहे. बोगस मतदान टाळण्यासाठी प्रत्येक मतदाराला त्याची ओळख पटल्यानंतरच मतदान करण्याची परवानगी दिली जाते. निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक अधिकारी मतदाराचे ओळखपत्र पाहून त्याची ओळख पटवून घेतात. निवडणूक आयोगाचा नियम आहे की, फक्त रिटर्निंग ऑफिसर किंवा पीठासीन अधिकारी तुमचे मतदार ओळखपत्र तपासू शकतात. मात्र, संशयास्पद परिस्थितीत पोलीस किंवा सुरक्षा कर्मचारी मतदाराचे ओळखपत्रही तपासू शकतात.

पोलिंग एजंट तपासू शकतात का? : बूथवर उपस्थित असलेल्या विविध राजकीय पक्षांचे पोलिंग एजंटदेखील कोणत्याही मतदाराचे ओळखपत्र तपासू शकत नाहीत. मात्र, संशय आल्यास ते निवडणूक अधिकाऱ्याला विचारून किंवा प्रश्न उपस्थित करून मतदार ओळखपत्र नक्कीच तपासू शकतात. पोलिंग एजंट फक्त मतदानातील फसवणूक टाळण्यासाठी किंवा सावध करण्यासाठी असतात. पोलीस किंवा सुरक्षा कर्मचारीही मतदार ओळखपत्र तपासू शकत नाहीत. केवळ संशय आल्यास ते तपासू शकतात.

पोलिसांना मतदार कार्ड तपासता येत नाही: निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे जारी करून परिस्थिती स्पष्ट केलीय. उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, पोलीस किंवा सुरक्षा कर्मचाऱ्यांचे काम केवळ सुरक्षा आणि शांतता राखणे आहे. ते कोणत्याही मतदाराचे ओळखपत्र तपासू शकत नाहीत. महिलांचा बुरखा काढूनही पोलीस तिच्या मतदार ओळखपत्राशी तिचा चेहरा जुळतो की नाही हे पाहू शकत नाहीत. पोलीस किंवा सुरक्षा कर्मचारी ओळखपत्रही तपासू शकत नाहीत. कोणत्याही मतदाराचे ओळखपत्र तपासण्याचा अधिकार फक्त रिटर्निंग ऑफिसरला आहे. रिटर्निंग ऑफिसर किंवा पीठासीन अधिकारीच मतदार कार्ड तपासू शकतात.

बुरखा काढून महिला मतदारांची तपासणी करता येईल का?: आता प्रश्न असा आहे की, मुस्लिम महिलेचा बुरखा काढून तपासता येईल का? तर त्याचे थेट उत्तर होय आहे. कोणतीही फसवणूक टाळण्यासाठी किंवा संशय आल्यास मतदान अधिकारी बुरखा काढून चेहरा तपासू शकतात. मात्र, यासाठी महिला निवडणूक अधिकारी असणे बंधनकारक आहे. याशिवाय धार्मिक संवेदनशीलता आणि गोपनीयतेचीही काळजी घ्यावी लागेल. मात्र पोलीस किंवा कोणताही सुरक्षा कर्मचारी बुरखा काढून महिलांचे चेहरे कोणत्याही किमतीत तपासू शकत नाही.

याआधीही बुरख्यावरून गदारोळ: बुरख्यावरून गदारोळ होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बुरख्यावरून गदारोळ झाला होता. हैदराबादमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार माधवी लता यांनी बूथवर बुरखा काढून महिला मतदारांचे ओळखपत्र तपासले होते. यावरून बराच गदारोळ झाला होता. या प्रकरणाला इतके महत्त्व प्राप्त झाले की, त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. हरियाणा निवडणुकीतही बुरख्यावरून वाद झाला होता. आता ताजा वाद उत्तर प्रदेशात आहे. मात्र, निवडणूक आयोगाने अखिलेश यांच्या पत्राला उत्तर दिले असून, कोणताही पोलीस बुरखा काढून महिलेचा चेहरा तपासू शकत नाही, असे सांगितले आहे.

उत्तर प्रदेशात कोणत्या जागांवर पोटनिवडणूक होत आहे?: उत्तर प्रदेशात विधानसभेच्या नऊ जागांवर पोटनिवडणूक होत आहे. यासाठी बुधवारी 7 सकाळपासून मतदान सुरू झालंय. बूथवर लांबच लांब रांगा दिसत आहेत. ज्या जागांवर पोटनिवडणूक होत आहेत, त्यात कटहारी (आंबेडकर नगर), करहल (मैनपुरी), मीरापूर (मुझफ्फरनगर), गाझियाबाद, माझवान (मिर्झापूर), शिशमाऊ (कानपूर सिटी), खैर (अलिगढ), फुलपूर (प्रयागराज) आणि कुंदरकी (मुरादाबाद) यांचा समावेश आहे. या पोटनिवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला समोर येणार आहे.

हेही वाचा :

  1. बिटकॉइन घोटाळ्याचा आरोप, काँग्रेससह सुप्रिया सुळेंची माजी आयपीएस अधिकाऱ्याविरोधात सायबर क्राईमकडं तक्रार
  2. "1 लाख मताधिक्यांनी निवडून येणार", राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.