ETV Bharat / entertainment

शाहरुखचा मुलगा आर्यन खानच्या डेब्यू सीरीजची झाली घोषणा, कंगना राणौतनं केलं कौतुक - KANGANA RANAUT

शाहरुख खाननं मुलगा आर्यन खानची डेब्यू सीरीजची घोषणा केली आहे. यावर कंगना राणौतनं प्रतिक्रिया दिली आहे.

Shah rukh and Aryan khan
शाहरुख आणि आर्यन खान (शाहरुख खान (IANS/ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 20, 2024, 1:29 PM IST

मुंबई : शाहरुख खाननं मुलगा आर्यन खानच्या डेब्यू सीरिजची घोषणा सोशल मीडियावर केली आहे. त्यानं आणि त्याची पत्नी गौरी खानच्या प्रोडक्शन हाऊस रेड चिलीजनं आर्यन खानच्या डेब्यू सीरिजसाठी नेटफ्लिक्सशी हातमिळवणी केली आहे. गौरी खान मुलगा आर्यन खानच्या डेब्यू वेब सीरीजची निर्मिती करत आहे. आतापर्यत आर्यन खानच्या वेब सीरीजचं नाव जाहीर करण्यात आलेले नाही. दरम्यान आर्यन खानच्या डेब्यू वेब सीरीजवर कंगना रणौतची प्रतिक्रिया आली आहे. आर्यन खानची वेब सीरीज ही चित्रपटसृष्टीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.

शाहरुख खानची घोषणा : शाहरुख खाननं त्याच्या एक्स हँडलवर मुलगा आर्यन खानच्या डेब्यू सीरिजबद्दलच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'हा एक खास दिवस आहे, जेव्हा एक नवीन कहाणी प्रेक्षकांसाठी सादर केली जात आहे. आजचा दिवस आणखीनच विशेष कारण रेड चिलीज एंटरटेनमेंट आर्यन खानची नवीन वेब सीरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करत आहे. या सीरीजची जबरदस्त कहाणी असणार आहे, यात चांगले सीन्स, भरपूर मजा आणि भावना असेल. आर्यन पुढे जा आणि लोकांचे मनोरंजन कर आणि लक्षात ठेव, शो बिजनेससारखा, दुसरा कोणताही बिजनेस नाही.' आर्यन खानची वेब सीरीज 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

कंगना राणौतनं दिली प्रतिक्रिया : अभिनेत्री आणि राजकारणी कंगना राणौतनं तिच्या इन्स्टास्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, यात तिनं लिहिलं, 'ही खूप चांगली गोष्ट आहे की, एका चित्रपट कुटुंबातून आलेल्या मुलानं अभिनय न करता चित्रपट दिग्दर्शन निवडले आहे, त्यानं मेकअप, वेट लॉस, डॉल अपच्या जागी चांगले काम निवडले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला थोडं उंचावर घेऊन जाणे आवश्यक आहे, जी काळाची गरज आहे, ज्यांच्याकडे साधनं आहे, ते लवकरच प्रवासात थकतात, आपल्याला कॅमेऱ्याच्या मागे खूप लोक हवे आहेत. आर्यन खान लेखक आणि चित्रपट निर्मितीकडे वाटचाल करत आहेत.' आता कंगनाच्या या पोस्टवर ृशाहरुख आणि आर्यन खानकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. सध्या सोशल मीडियावर कंगनाची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

  1. कंगनाच्या पोस्टनं सामंथा रुथ प्रभू झाली प्रभावित, केलं सोशल मीडियाच्या माध्यामातून कौतुक
  2. 'किंग'मधील शाहरुख खानच्या नवीन हेअरस्टाईचे फोटो व्हायरल...
  3. शाहरुख खान स्टारर रोमँटिक लव्हस्टोरी चित्रपट बॉक्स ऑफिसवर रि- रिलीज 'या' तारखेला होईल...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.